शिवसेनेचा पारंपारिक मतदार 'कोंकणी-माणूस' दुरावण्याची शक्यता : सविस्तर

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंचं २०१४ मधील कणकवलीत झालेलं भाषण आज सुद्धा कोकणी माणसाच्या चांगलं लक्षात आहे. त्यांनी भर सभेत दिलेली वचन आणि सरकार आल्यावर घडलेल्या घटनाक्रमाने कोंकणी माणूस शिवसेनेवर नाराज असल्याचे समजते. मग तो कोकणातला स्थायिक असो किंव्हा मुंबई – ठाण्यात राहणारा चाकरमानी.
आमचा खासदार आणि आमदार निवडून द्या मी स्वतः जातीने कोकणच्या विकास कामात लक्ष घालेन हा उद्धव ठाकरेंचा भर सभेतील शब्द कोकणी माणूस कधीच विसरणार नाही. २०१४ मध्ये कोकणी माणसाने विशेष करून सिंधुदुर्ग पट्यात शिवसेनेला भरभरून मतदान केलं. ‘कोकणची माणसं साधी भोळी’ हे वाक्य उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना भाषणा दरम्यान बोलून दाखवलं होत.
परंतु सत्तेत आल्यावर चार वर्ष शिवसेनेकडून कोकणात कोणतीच विकासाची कामं झाली नाहीत आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे कोकणावर काय लक्ष ठेवलं हे कोकणी माणसाला चांगलंच उमगलं आहे. सध्या नाणार रिफायनरी प्रकल्पावरून निर्माण झालेली राजकीय परिस्थिती बघता, शिवसेना पूर्ती गोंधळलेल्या अवस्थेत असल्याचे सर्वच माध्यमांच्या चर्चेतून दिसत आहे.
कोकणी माणूस हा मुळातच निसर्ग प्रेमी माणूस. त्या कोकणच्या निसर्ग प्रेमापोटीच मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात नोकरी धंद्यासाठी स्थिरावलेला कोकणाचा माणूस त्यांच्या ‘गावात’ जाण्याचा बहाणाच शोधत असतो हे सत्य आहे. कोकणी माणसाला विकास नको आहे हे धादांत खोटं असल्याचं कोकणी माणूस बोलून दाखवतो. परंतु निसर्गरम्य कोकणात पर्यटनातून आणि फळ उद्योगातून प्रचंड मोठा रोजगार आणि देशाला परकीय चलन सुद्धा मिळू शकत हे राज्यकर्त्यांना कळत का नाही ही हुरहूर त्यांच्या मनात आहे. अगदी ‘एनरॉन’ सारख्या प्रकल्पाने काय हाती लागलं हे सर्वश्रुत आहे.
त्यातच नाणार रिफायनरी प्रकल्प आणि निर्माण झालेली परिस्थिती पाहता कोकणी माणसाच्या मनात शिवसेनेबद्दलचा रोष खूप वाढला आहे. २०१४ मधील कणकवलीतील भर सभेत उद्धव ठाकरे यांनी कोकणी माणसाला वचन दिलं होत की,’कोकणच्या विकासात मी स्वतः लक्षं घालेन’. पण प्रत्यक्ष कोकणच्या निसर्गाला, खाडी, अरबी समुद्र आणि नद्यांना विनाशकारी ठरणारा नाणार रिफायनरी प्रकल्प कोकणांत आला आणि शिवसेनेबद्दल रोष वाढतच गेला.
शिवसेनेकडे असलेल्या उद्योग खात्यानेच नाणारमधील जमीन भूसंपादनाचा अध्यादेश जरी केला आणि कोकणात एकच संतापाची लाट उसळली. कोकणी माणसाने तर शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला की, ‘आधी उद्योग खात्याने जरी केलेला जमीन भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करा आणि मगच कोकणात पाय ठेवा’. सेनेचा पारंपरिक मतदार असलेल्या कोकणी माणसाचा हा इशारा सर्व काही सांगून जातो.
आपल्या पारंपरिक कोकणी मतदारानेच थेट इशारा दिल्याने शिवसेना पूर्ती गोंधळली आणि काही करून कोकणात सभा आयोजित करण्याचे ठरवले. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी नाणार जमीन भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करत असल्याचे जाहीर केले. ही घोषणा होते न होते तशी पुढच्या पंधरा मिनिटांमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं की मंत्र्यांना भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्याचा अधिकारच नसतो. तिथेच कोकणी माणसाच्या लक्षात आलं की शिवसेना केवळ वेळ मारून नेण्यासाठी आणि सामान्य कोकणवासीयांच्या प्रशासकीय अज्ञानाचा फायदा घेऊन, आपली फसवणूक होत आहे हे लक्षात आल्याने खूपच संतापला आहे.
निसर्ग-वेडा आणि गावं-वेडा शहरी कोकणी माणूस आता लवकरच सह-कुटुंब कोकणातील आपल्या गावी सुट्टी निमित्त प्रयाण करेल. त्यावेळी कोकणातल्या घराघरात ही चर्चा रंगणार आहे हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे संपूर्ण कोकणात आणि शहरी भागातल्या कोकणच्या भोळ्या माणसाने, जर येत्या निवडणुकीत शिवसेनेला ‘कोकणी-बाणा’ दाखवला तर नवल वाटायला नको.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: YESBANK
-
Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक अजून घसरणार, ग्लोबल फर्मने दिला अलर्ट, टार्गेट जाणून घ्या - NSE: IDEA