6 November 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Lakhimpur Kheri Incident | उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती | पवारांची संतप्त प्रतिक्रिया

Lakhimpur Kheri Incident

पुणे, ०५ ऑक्टोबर | लखीमपूर या ठिकाणी शेतकऱ्यांसोबत झालेल्या हिंसाचाराबाबत देशभरातून संताप व्यक्त होतो आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या सगळ्या बाबत उत्तर प्रदेश सरकार आणि मोदी सरकार यांच्याकडून काही प्रतिक्रिया आलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या घटनेबाबत (Lakhimpur Kheri Incident) संताप व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशात जालियानवाला बाग सारखी परिस्थिती आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.

Lakhimpur Kheri Incident. NCP president Sharad Pawar has expressed anger over the incident. In Uttar Pradesh, Jallianwala has a garden-like situation, said Sharad Pawar :

दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचा एक मोठा वर्ग आंदोलन करत आहे, शांतीने आंदोलन सुरू आहे, मात्र २६ जानेवारीला त्यांच्यावर हल्ला केला गेला, ज्याच्या प्रतिक्रिया पूर्णपणे देशभर उमटल्या. लोकशाहीमध्ये शांततेने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार आहे. लखीमपूर इथं जमलेले शेतकरीही शांततेने आंदोलन करत होते, आमच्या मागण्या मांडत होते. मात्र त्यांच्या अंगावर गाडी चढवण्यात आली. ज्यात काही जणांचा मृत्यू झाला. मी या घटनेचा तीव्र निषेध करतो.

पण फक्त निषेध करून आम्हाला शांती मिळणार नाही. या प्रकरणाचा तपास,चौकशी केली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे. दूध का दूध पानी का पानी झालं पाहिजे. या प्रकारामुळे केंद्र सरकारची नियत काय आहे, हे दिसून येतं आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे म्हणून ते शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र त्यामध्ये ते यशस्वी होणार नाहीत. हातात असलेल्या ताकदीचा गैरवापर केला जात आहे. शेतकऱ्यांनो, भले तुमच्यावर हल्ला झाला असेल आम्ही तुमच्या बरोबर आहोत. असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Incident NCP president Sharad Pawar criticized BJP.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x