18 November 2024 6:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Lakhimpur Kheri Violence | तिकीट नाकारलेल्या नेत्याच्या जिल्हा बंदीवरून भाजपचे स्टंट | तर सत्ता असलेल्या राज्यात दडपशाही

Lakhimpur Kheri Violence

लखनऊ , ०४ ऑक्टोबर | हिंसाचारग्रस्त लखीमपूर खेरी जिल्ह्यात (Lakhimpur Kheri Violence) पीडितांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी निघालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वॉड्रा यांना सोमवारी हरगाव येथून अटक करण्यात आली आहे, असा दावा पक्षाच्या युवा शाखेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही. यांनी केला आहे. दरम्यान, केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने कथितरीत्या शेतकरी आंदोलकांवर कार चढवली. यात 8 जण चिरडले आहेत.

Lakhimpur Kheri Violence. Permission denied for Chattisgarh CM Bhupesh Baghel and Punjab CM Charanjit Singh Channi flight to land in Lucknow Lakhimpur Kheri :

शेती कायद्यांना विरोध करण्यासाठी शेतकरी काळे झेंडे हातात घेऊन आंदोलन करत होते. या दरम्यान केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिषने आंदोलकांवर गाडी चढवली. यात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. या घटनेनंत प्रियांका गांधी पीडित शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी निघाल्या. मात्र त्यांना अनेक ठिकाणी रोखण्यात आलं. प्रथम त्यांना लखनौ विमानतळावर रोखण्यात आले.

प्रियांका गांधी मध्यरात्रीच लखीमपूरकडे रवाना झाल्या. मात्र पोलीस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना घटनास्थळी न जाण्यास सांगितले. पण प्रशासनाकडे कोणताही आदेश आणि वॉरंट नसल्याने प्रियांका गांधी न जुमानता लखीमपूरकडे रवाना झाल्या. पण उत्तर प्रदेश पोलिसांनी त्याला सीतापूरच्या हरगाव येथे ताब्यात घेतले.

त्यानंतर आता दोन मुख्यमंत्र्यांची विमाने उत्तर प्रदेशमध्ये उतरण्यास योगी सरकारने परवानगी नाकारली आहे, त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये नेमकं चाललंय काय?, असा सवाल उपस्थित होत आहे. उत्तर प्रदेश सरकारने मला राज्यात पाऊल न ठेवण्याचा आदेश काढलाय. उत्तर प्रदेश सरकार नागरिकांच्या अधिकारांवर बंधनं का आणत आहे?, जर लखीमपूरला कलम 144 लागू आहे तर मग लखनौला विमान उतरण्यास परवानगी का नाकारण्यात आली आहे. हे सरकार हुकुमशाही पद्धतीने वागत आहे, योगी सरकारचा निषेध, अशा संतप्त भावना मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी व्यक्त केल्या आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Violence permission denied for congress leaders in Uttar Pradesh.

हॅशटॅग्स

#Yogi Government(87)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x