5 November 2024 9:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

Lakhimpur Kheri Violence | भाजप सरकारने प्रियांका गांधींना अस्वच्छ गेस्ट हाऊसमध्ये ठेवले | स्वतःच केली साफसफाई

Lakhimpur Kheri Violence

लखनऊ , ०४ ऑक्टोबर | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गाधी या लखीमपूरकडे (Lakhimpur Kheri Violence) निघाल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना हरगावमध्येच ताब्यात घेतलं आहे. त्यांना सीतापूरच्या एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे. प्रियंका गांधी यांनीही या गेस्ट हाऊसमध्ये गांधीगिरी करत गेस्ट हाऊसमध्ये साफसफाई केली आहे. हातात झाडू घेऊन गेस्ट हाऊसची साफसफाई करतानाच प्रियंका यांचा फोटोही व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.

Lakhimpur Kheri Violence. Priyanka Gandhi protests detainment by Uttar Pradesh Police. Sweeps PAC Guest House :

प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सीतापूर येथील एका गेस्ट हाऊसमध्ये ठेवले आहे. या गेस्ट हाऊसमध्ये हातात झाडू घेऊन साफसफाई करतानाच प्रियंका गांधी यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 45 सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत प्रियंका गांधी एकट्याच दिसत आहे. संपूर्ण रुमखाली आहे. त्या या रुममध्ये झाडू मारताना दिसत आहेत. प्रियंका यांना पीएसीच्या 22 व्या बटालियनच्या गेस्ट हाऊसमध्ये ठेवण्यात आलं आहे.

प्रियंका गांधी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. प्रियंका, मला माहीत आहे तू मागे हटणार नाहीस. तुझ्या हिंमतीमुळे ते तुला घाबरले आहेत. न्यायाच्या या अहिंसक लढाईत आपण देशातील अन्नदात्याला विजय मिळवून देऊच, असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Lakhimpur Kheri Violence Priyanka Gandhi protests detainment by Uttar Pradesh Police.

हॅशटॅग्स

#PriyankaGandhi(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x