6 November 2024 2:54 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

देश निर्माण? मंदिर कार्यक्रमात भाजप नेत्याकडून खाद्यपदार्थांसोबत दारु वाटप, लहान मुलांना सुद्धा

हरदोई : भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुलाने मंदिरामध्ये कार्यक्रमादरम्यान खाद्यपदार्थांच्या पाकिटातून मोठ्या प्रमाणावर दारुच्या बाटल्यांचे वाटप केल्याचा धक्कादायक वृत्त हाती आले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांचा मुलगा नितीन याने सोमवारी पासी समाजासाठी श्रावण देवी या मंदिरामध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

त्यावेळी उपस्थित लोकांना खाद्यपदार्थांच्या पाकिटातून दारुच्या बाटल्या सुद्धा वाटण्यात आल्या आहेत. दुसरी धक्कादायक गोष्ट म्हणजे कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या लहान मुलांनासुद्धा ते दारू वाटप करण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त बिझनेस स्टँडर्डने प्रसिद्ध केले आहे.

तसेच सदर कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात भाजप नेते नितीन अग्रवाल व्यासपीठावरुन खाद्य पदार्थांची पाकिटे गावाच्या प्रमुखाला देण्यात येतील. त्यांच्याकडून तुम्हाला ही पाकिटे दिली जातील, अशी जाहीर घोषणा करताना ते दिसत आहेत. दरम्यान, खाद्यपदार्थांच्या पाकिटाचे वाटप सध्या सुरु आहे, त्याठिकाणी गावच्या प्रमुखांनी जाऊन ती बंद पाकिटे आपल्या ताब्यात घ्यावीत आणि तुमच्या सोबत आलेल्या लोकांना वाटप करावे असे अग्रवाल उपस्थितांना आवाहन करत होते. परंतु, त्यात दारूच्या बाटल्या असल्याचे त्यांनी अजिबात भाष्य केले नाही. परंतु, ती खाद्यपदार्थांची पाकीट उघडताच सर्वांना धक्काच बसला, कारण मोठ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत वाटण्यात आलेल्या या पाकिटामध्ये दारूच्या बाटल्या सुद्धा भरलेल्या होत्या हे धक्कादायक म्हणावे लागेल.

दरम्यान, उपस्थित लहान मुलांना प्रसार माध्यमांनी विचारले असता ते म्हणाले की, ‘मी माझ्या वडिलांसोबत लांबून आलो आहे. नितीन अग्रवाल यांनी हे पाकिट दिले’ असे त्यांनी सांगितले. दरम्यान हरदोई येथील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार अंशुल वर्मा यांनी खाद्यपदार्थांसह दारुचे वाटप केल्याबद्दल अग्रवाल यांच्यावर सडकून टीका केली. वरिष्ठ पक्षनेत्यांकडे मी याची तक्रार करणार असल्याचे वर्मा यांनी सांगितले.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x