16 January 2025 10:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

अजब! २५० दहशतवादी मारल्याचा आकडा मी सर्वसामान्यांमध्ये रंगलेल्या चर्चेतून दिला: अमित शहा

BJP, Amit Shah, Air Strike

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी एअर स्ट्राइकमध्ये २५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा एका सभेत केला होता. या दाव्यानंतर विरोधकांकडून भाजप आणि अमित शहांवर जोरदार टीकास्त्र सोडल होतं, तसेच २५०चा नेमका आकडा अमित शहा यांनी कोणत्या आधारावर दिला, असा प्रश्न विरोधकांनी विचारला होता, त्यावर अखेर अमित शहा यांनी मौन सोडलं आहे.

एअर स्ट्राइकनंतर देशभरात जे वातावरण निर्माण झालं होतं, अनेक माध्यमातून भारताने पाकिस्तानमध्ये घुसून एवढे दहशतवादी मारले अशी चर्चा सुरु होती. माध्यमांमध्येही एअऱ स्ट्राइकनंतर २५० ते ३०० दहशतवादी मारल्याचा दावा केला होता. मी सरकारचा प्रतिनिधी नाही, जी चर्चा सर्वसामान्यांमध्ये होती त्याच आधारावर मी ते वक्तव्य केलं असल्याचं भाजपा अध्यक्ष अमित शहा यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडीयाला दिलेल्या मुलाखतीत शहा बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखांच्या घोषणा झाल्यानंतर अमित शहा यांची दिलेली ही पहिलीच मुलाखत आहे.

पाकिस्तानच्या प्रसार माध्यमांमध्ये आणि संसदेत असा दावा केला की, पाकिस्ताने भारतात २० लढाऊ विमाने पाठवली त्यांच्या या खोट्या दाव्याने कळून येतं की पाकिस्तानला एअर स्ट्राइकचा किती धसका बसला असेल. पाकिस्तानात दहशतवादी मारले गेले असा पाकिस्तानी मिडीया बोलत आहे तर भारतात विरोधी पक्ष या एअर स्ट्राइकबाबत पुरावे मागत आहे.

या मुलाखतीत अमित शहा यांनी सांगितले की, देशाच्या सुरक्षेसाठी नरेंद्र मोदी यांच्या सारखे कणखर नेतृत्व आहे. मोदींच्या नेतृत्वात अर्थव्यवस्थेत देशाने आघाडी घेतली आहे. सध्या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतं हा मुद्दा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात देशाला सुरक्षित ठेवण्याची क्षमता आहे. निवडणुकीच्या काळात देशाची सुरक्षा हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. देशात मोदींच्या नेतृत्वात बहुमतात सरकार आलं तर राष्ट्रीय सुरक्षा मजबूत बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x