13 January 2025 11:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा
x

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सुद्धा नितीश कुमार यांच्यासोबत एकत्र येणार, भाजपचे धाबे दणाणले, बैठकांचा सपाटा

Loksabha Election 2024

Loksabha Election 2024 | 2024 च्या लोकसभा निवडणुकीला अजून वेळ आहे, मात्र भाजपच्या राजकीय विरोधकांनी कंबर कसली आहे. एकीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीला भेट देऊन विरोधी पक्षनेत्यांना एकत्र आणण्याबाबत बोलत आहेत, तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘खेला होबे’ असं म्हटलं आहे.

2024 मध्ये आम्ही एक गेम खेळू :
आज बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कोलकात्यात कार्यकर्त्यांना संबोधित केलं. 2024 मध्ये, आम्ही एक सामना खेळू ज्याची सुरुवात बंगालपासून होईल. तेव्हा हेमंत, अखिलेश, नितीश, मी आणि इतर मित्र एकत्र येऊ. मग भाजप सरकार कसे स्थापन करणार? भाजप सरकारची गरज नाही असं त्या म्हणाल्या.

मी, नितीश कुमार, हेमंत सोरेन आणि इतर अनेक जण 2024 मध्ये एकत्र येऊ. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येतील. एका बाजूला आम्ही सर्व जण असू आणि दुसऱ्या बाजूला भाजप असेल. भाजपचा ३०० जागांचा अहंकार हेच त्याचे भाग्य असेल. 2024 मध्ये ‘खेला होबे’ निश्चित आहे असं म्हटलं आहे.

भाजपला वाटते की ते आम्हाला घाबरवू शकतात :
सीबीआय आणि ईडीमुळे आपण घाबरून जाऊ शकतो, असं भाजपला वाटतं, पण ते अशा डावपेचांचा जितका जास्त अवलंब करतील, तितकेच ते पुढच्या वर्षी होणाऱ्या पंचायत निवडणुका आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभूत होण्याच्या जवळ येतील.

नितीश कुमारही विरोधकांना एकत्र आणण्यात गुंतले :
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आले होते. दिल्लीत नितीशकुमार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मुलायमसिंह यादव, अखिलेश यादव, ओपी चौटाला, सीताराम येचुरी या विरोधी पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली.

बिथरलेल्या भाजपच्या बैठका :
मंगळवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांनी लोकसभेच्या १४४ जागांवर पक्ष आणखी मजबूत कसा करता येईल, याबाबत केंद्रीय मंत्र्यांसोबत आढावा घेतला. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे दिल्लीत विरोधी पक्षनेत्यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपविरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Loksabha Election 2024 West Bengal CM Mamata Banerjee check details 08 September 2022.

हॅशटॅग्स

#Loksabha Election 2024(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x