21 April 2025 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL
x

मार्चमधील आचारसंहितेपूर्वी भाजप उदघाटनसोहळे करण्याच्या तयारीत : सविस्तर

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यास आणि लोकसभा निवडणुका घोषित व्हायला तसेच निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास आता केवळ ७० दिवस शिल्लक आहेत. अंदाजे ६ ते ८ मार्चच्या दरम्यान लोकसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा निवडणूक आयोग करेल, अशी शक्यता आहे. सध्या परदेश दौऱ्यावरून ब्रेक घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी या ७० दिवसांत देशभराच्या दौऱ्यावर जाऊन नव्या आणि अपूर्ण स्थितीत असलेल्या का होईना अशा विविध योजना आणि प्रकल्पांची निवडणुकीआधी घोषणा करणार असल्याचे वृत्त आहे.

रस्तेबांधणीसह सर्व पायाभूत सुविधा योजनांची कामे घाईघाईत पूर्ण करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. हा सर्व लोकसभा निवडणूकपूर्व खटाटोप केवळ काँग्रेसवर हल्ला चढवण्यासाठी मोदी आखात असल्याचे समजते. दरम्यान, जर निवडणूक आयोगाने आचारसंहिता जाहीर केली तर कोणत्याही घोषणा करणे शक्य होणार नाही. आणि ज्या घोषणा जाहीर केल्या जातील त्या आम्हीच पूर्ण करू किंवा आम्हाला पुन्हा सत्तेत बसवलं तरंच पूर्ण होतील असा भ्रम मतदाराभोवती निर्माण केला जाईल.

फेब्रुवारीमध्ये सर्व घोषणाबाजीला मोदी जोराने सुरुवात करतील. पुढचे ५० दिवस ते केवळ उद्घाटन, पायाभरणी तसेच नव्या योजना व प्रकल्प यांसाठीच व्यस्त राहणार असल्याचे वृत्त आहे. धक्कादायक म्हणजे नव्या योजना आणि घोषणांसाठी हंगामी अर्थसंकल्पापर्यंत सुद्धा मोदी सरकार तयार नसल्याचे समजते. त्यामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन ८ जानेवारी रोजी पूर्ण होताच, तरुणांना रोजगार, एमएसएमई तसेच अन्य योजना जाहीर करण्यात येतील. कारण, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३० जानेवारी ते १५ फेब्रुवारी या काळात होईल.

पंतप्रधान मोदी लोकसभा निवडणुकीपूर्वी असाच घोषणांचा सपाटा लावून “फिर एक बार, मोदी सरकार” ह्या घोषणा देण्यास सुरुवात करणार आहेत. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, अर्थमंत्री अरुण जेटली आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाची विशेष योजना तयार केली आहे. त्यानुसार “फिर एक बार मोदी सरकार’ ही भाजपाची घोषणा निश्चित झाली असली तरी नरेन्द्र मोदी यांना याहून सुद्धा आकर्षक घोषणा हवी आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या