15 January 2025 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

मराठा समाजाचा उद्रेक होण्यापूर्वी आरक्षणाबाबत तोडगा काढा: उदयनराजे भोसले

पुणे : आज मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी पुण्यात खासदार उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यभरातील शेकडो समन्वयकाच्या उपस्थितीमध्ये मराठा आरक्षण परिषद पार पडली.

त्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता सरकारला गंभीर इशारा दिला आहे. केवळ सोयीच्या राजकामुळे या आंदोलनात आजपर्यंत अनेक बळी गेले आहेत. त्यांच्यावर मुलभूत अधिकारांसाठी भिकाऱ्यासारखे फिरण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत सरकारने त्वरीत तोडगा काढावा, नाहीतर मराठा समाजाचा उद्रेक होईल असा गंभीर इशारा त्यांनी उदयनराजे यांनी सरकारला दिला आहे.

दरम्यान त्यांनी आरक्षणाबाबत निर्णय होईल, लोकांनी तोडफोड-जाळपोळ करू नका, असे आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी आंदोलनकर्त्यांना केले आहे. त्यामुळे पुढे सरकार’कडून पुढे काय हालचाली होतात ते पाहावं लागणार आहे.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x