17 April 2025 10:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | खरेदीनंतर संयम ठेवा, श्रीमंत करू शकतो हा शेअर, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA
x

फक्त अजित डोभालची सखोल चौकशी करा, सर्व सत्य बाहेर येईल: राज ठाकरे

National Security Advisor Ajit Doval, Raj Thackeray

कोल्हापूर : सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले आहे. त्यात पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ’च्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४० जवान शहीद झाले आणि त्यामुळे पाकिस्तानविरोधात देशभरात रोष व्यक्त करण्यात येतो आहे. दरम्यान, सध्या पाकिस्तान विरोधात वातावरण तापलेले असताना राज ठाकरे यांनी पुन्हा एक धक्कादायक विधान केल्याने राजकीय वातावरण ढवळून निघण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मोदी सरकारच्या काळात अगदी नोटबंदीपासून ते पुलवामा हल्ल्यापासून सर्वच गंभीर विषयांमधील वास्तव उघड करायचं असेल तर आधी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची सखोल चौकशी करा, म्हणजे सगळंच सत्य समोर येईल असं खबळजनक विधान राज ठाकरे यांनी केलं आहे. अनेक विरोधकांनी यापूर्वी अजित डोभाल यांच्या मुलाची पाकिस्तानी कंपनीत गुंतवणूक आणि पार्टनरशिप असल्याचा आरोप केला होता.

तसेच नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अनेक चुकीच्या गोष्टी घडल्या असून त्याबद्दल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना सर्व माहिती असल्याने आधी त्यांची सखोल चौकशी करा, असं राज ठाकरेंच्या आरोपा मागील कारण असल्याचे दिसते.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या