21 January 2025 4:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी स्टॉक इन्फोसिसवर टॉप ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मोठा परतावा देणार - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: JIOFIN SIP Investment | पगारदारांनो, SIP गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याचा 'हा' फॉर्म्युला माहित आहे का, 5 कोटी रुपये परतावा मिळेल IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअरबाबत चार्टवर महत्वाचे संकेत, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: IREDA BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL
x

लवकरच भाजपाला मोठं राजकीय खिंडार पडणार | भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करणार?

BJP Maharashtra

मुंबई, १८ सप्टेंबर | महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. कारण, भारतीय जनता पक्षातील अनेक आमदार हे सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाचे काही आमदार हे येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

लवकरच भाजपाला मोठं राजकीय खिंडार पडणार, भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश करणार? – Many BJP MLAs will join NCP and Shivsena soon as per report :

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्षाला मोठं खिंडार पाडण्याची तयारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित मानला जात असून पुढील आठवड्यात हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. तर काही आमदार हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीने मोठी रणनीती आखली असल्याचं बोललं जात आहे.

प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या माहितीनुसार, काही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तर काही आमदारांनी स्थानिक परिस्थिती पाहता शिवसेनेत प्रवेश (BJP MLAs will Join NCP and Shivsena) करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता उत्सुकता एवढीच शिल्लक आहे कि ते आमदार कोण आणि कोणत्या मतदारसंघातील ते पाहावं लागणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Many BJP MLAs will join NCP and Shivsena soon as per report.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x