15 January 2025 8:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
x

पक्षप्रमुख अयोध्याला असताना अनेकांचा सेनेला राम-राम करत शिवसंग्राममध्ये प्रवेश

बीड : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर असताना अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेला राम राम करत शिवसंग्राम पक्षाचा भगवा हाती घेतला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेला जयमहाराष्ट्र करताना पक्षाचे विधानसभा प्रमुख सुदर्शन धांडे यांनी “शिवसैनिक वाघांनो सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा” ही समाज माध्यमांवर टाकलेली पोस्ट खूप काही सांगून जाणारी आहे.

काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेने सचिन मुळूक तसेच कुंडलिक खांडे यांच्यावर जिल्हाप्रमुख सारख्या महत्वाच्या पदांची जवाबदारी दिली होती. सचिन मुळूक यांच्याकडे केज, माजलगाव आणि परळी या महत्वाच्या ३ मतदार संघाची जवाबदारी आणि कुंडलिक खांडे यांच्याकडे पक्षाचे बीड, गेवराई आणि आष्टी ३ प्रमुख मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यानंतर, काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख, विधानसभा प्रमुख, शहर प्रमुख, तालुका प्रमुख आदी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली आणि स्थानिक राजकारणाला सुरुवात झाली झाली. त्यात अनेक जुन्या आणि कट्टर शिवसैनिकांनी समाज माध्यमांवर तिखट भावना व्यक्त करायला सुरुवात केली होती.

दरम्यान, शिवसेनेने ” पहिले मंदिर फिर सरकार’ चा नारा देत अयोध्येवर कुच केली. मागच्या तीन दिवसांपासून विविध माध्यमांवर शिवसेनेचीच चर्चा आहे. या मोहिमेत दोन्ही जिल्हा प्रमुखांसह जिल्ह्यातील इतर प्रमुख पदाधिकारीही या मोहिमेत सहभागी झाले. शनिवारी उद्धव ठाकरेंनी शरयु नदीतीरी आरती करतेवेळी जिल्ह्यातील मंदिरांतही शिवसैनिकांनी आरतीचा गजर केला.

विशेष म्हणजे अयोध्येला दौऱ्यावर गेलेले स्थानिक पदाधिकारी तेथील फोटो सोशल मिडीयावर शेअर होत असताना माजी शहरप्रमुख, पक्षाचे बीड नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राहिलेले आणि सध्या विधानसभाप्रमुखपदाची जबाबदारी असलेल्या सुदर्शन धांडे यांनी “अखेरचा जय महाराष्ट्र’ म्हणण्याबरोबच “शिवसैनिकांनो सावधान सावकारकीसाठी स्वत:चा वापर होऊ देऊ नका, एवढीच अपेक्षा’ अशी पोस्ट टाकून शिवसेनेतील खदखद जाहीर केली होती. बीडमध्ये पक्षविस्तार करण्यासाठी सरसावलेल्या पक्ष नैतृत्वाला स्थानिक पदाधिकाऱ्यांनीच इंगा दाखवल्याचे स्थानिक लोकं बोलत आहेत.

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x