13 January 2025 11:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | पीएसयू इरेडा शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, ICICI डायरेक्ट ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IREDA Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांकडून महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON Penny Stocks | अवघा 64 पैशाचा पेनी शेअर मालामाल करतोय, यापूर्वी दिला 700 टक्के परतावा - Penny Stocks 2025 Penny Stocks | 1 रुपया 59 पैशाचा पेनी स्टॉक खरेदीला गर्दी, श्रीमंत करू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, पेनी स्टॉकवर होणार परिणाम - NSE: IDEA SIP Mutual Fund | 4000 गुंतवणुकीतून 20 लाखांचा फंड तयार होण्यासाठी किती वर्षांचा काळ लागेल, पैशाने पैसा वाढवा Post Office Scheme | दुप्पटीने पैसे वाढवणारी पोस्टाची सुपरहिट योजना; पडेल पैशांचा पाऊस, सविस्तर कॅल्क्युलेशन पहा
x

ठाण्यात मराठा आंदोलनातील हिंसाचारात शिवसेना माजी नगरसेवक आणि शाखाप्रमुखाचा समावेश

ठाणे : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन व बंद स्थगित केल्याची घोषणा समन्वयकांनी केल्यानंतर सुद्धा ठाण्यात नितिन कंपनी येथे रस्ता रोको आंदोलन करणाऱ्यांना ठाणे पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केले होती. परंतु त्यानंतर सुद्धा हिंसाचार भडकून दंगल सद्रुश्य परिस्थिती झाली होती. पुराव्याअंती याप्रकरणात इतर ३८ जणांना अटक तर झालीच परंतु त्या व्यतिरिक्त शिवसेनेचे माजी नगरसेवक शरद कणसे आणि अशोक कदम हे सुद्धा त्या हिंसाचारात सामील असल्याच सीसीटीव्ही फुटेज वरून समोर आल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

या सर्वांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. तसेच या संपूर्ण हिंसाचार प्रकारात ठाणे शहरात ४५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत असं पोलीस प्रशासनाच्या प्रतिनिधींनी सांगितलं. दुपारी ३ च्या सुमारास ठाणे पोलिसांनी या सर्वांना आंदोलन स्थगित झाल्याची माहिती दिली आणि रस्ता सुरळीत करण्याचं आवाहन केलं. परंतु उपस्थितांनी उन्मत्त पणा करत हटवादी भूमीका घेतली आणि त्यामुळेच दंगलीचा भडका उडाल्याचे ठाणे पोलिसांनी स्पष्ट केलं.

हिंसक आंदोलनांमुळे आणि तुफान दगडफेकीत नौपाडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार लामतुरे, उपायुक्तांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे आणि निलेश मोरे हे तीन अधिकारी जखमी झाले होते. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. परंतु सर्वकाही ठीक असताना आणि कोणत्याही हिंसाचाराची गरज नसताना जाणीवपूर्वक परिस्थिती चिघळविण्यात आली असं पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांवर नाहक दगडफेक करण्यात येत होती. त्यानंतर मात्र दोन ते अडीच तास संयम बाळगून असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी सौम्य लाठीमार केला तरी आंदोलन सुरुच राहिल्यानंतर अखेर अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्याचे पोलिसांनी माध्यमांना सांगितले.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x