26 April 2025 6:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

मराठा आरक्षण; उद्या मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक

मुंबई : दादरमधील राजर्षी शाहू सभागृहात मराठा क्रांती मोर्च्याच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली असता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात बंदची हाक देण्यात आली आहे. बंददरम्यान तोडफोड आणि हिंसा करु नये, असे आवाहन मराठा मोर्चा समन्वयकांनी केले आहे.

सध्या राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी जाळपोळीचे प्रकार घडले असून काकासाहेब शिंदे या मराठा युवकाने जीव सुद्धा गमावला आहे. त्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी पोलीस वाहन सुद्धा जाळण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे सर्वच ठिकाणी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.

मराठा समाजाची संबंधित पदाधिकारी बैठकांवर बैठका आयोजित करण्यात व्यस्त झाले आहेत. त्यात औरंगाबाद नंतर आता थेट मुंबईपर्यंत या आंदोलनाची धग पोहोचण्याची चिन्ह आहेत. त्याचाच भाग म्हणून उद्या बुधवारी मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे बंदची हाक देण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maratha Kranti Morcha(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या