5 November 2024 5:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC
x

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत यादव-मुस्लिम वोट बँके फोडून एमआयएम अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत करतंय?

Uttar Pradesh Assembly Election 2022

लखनऊ , ११ सप्टेंबर | उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे मुस्लिम समाज समाजवादी पार्टीला मतदान करतो आहे. मुलायम सिंग यादव यांच्या काळापासून त्यांनी 11% यादव आणि 19 टक्के मुस्लिम मतांची गोट बँक समाजवादी पार्टीबरोबर घट्ट बांधून टाकली आहे. ही वोट बँकच फोडण्याचा हैदराबादचे एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांचा प्रयत्न आहे.

उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत यादव-मुस्लिम वोट बँके फोडून एमआयएम अप्रत्यक्षरीत्या भाजपाला मदत करतंय?  – MIM Owaisi trying to dismantle Muslim Yadav vote bank in Uttar Pradesh Assembly Election 2022 :

ओवैसी यांनी गेल्या तीन दिवसांत जे आपल्या उत्तर प्रदेश दौऱ्यामध्ये सुलतानपूर बाराबंकी फैजाबाद येथे मुस्लिम मेळाव्यांना संबोधित केले त्यामध्ये मुसलमानांना आपल्या वोट बँकेची ताकद समजावण्याचा प्रयत्न केला. 11% यादव जर उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री ठरवत होते तर 19 % मुसलमान आपल्याला हवे तसे आमदार का निवडून आणू शकत नाहीत?, असा सवाल त्यांनी केला. यादवांना मुख्यमंत्री मंत्री व्हावेसे वाटते पण मुसलमान मात्र त्यांना संत्री, चपरासी हवे असतात. यादवांना मुसलमानांची मते पाहिजेत पण त्यांच्या डोळ्यातल्या अश्रूंची त्यांच्या समस्यांची त्यांना काही देणे घेणे नाही. मुसलमानांनी कधीतरी हा विचार केलाय का?, असा रोकडा सवाल ओवैसी यांनी केला.

एकीकडे यादव – मुस्लिम वोट बँक फोडत असताना दुसरीकडे मायावतींनी बहुजन समाज पक्ष साफसूफ करत असताना ज्यांना पक्षाच्या तिकिटावर पासून वंचित ठेवले आहे, त्या अतीक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांना असदुद्दीन ओवैसी यांनी जवळ केले आहे. त्यांची माफिया प्रतिमा मायावतींच्या अडचणीची ठरत होती पण हीच प्रतिमा ओवैसींना मुसलमानांना आकर्षित करणारी वाटत आहे. त्यामुळे त्यांनी अतीक अहमदची पत्नी परविन हिला पक्षात प्रवेश दिला आणि मुख्तार अन्सारीला त्याला हवेत तिथून तिकीट देण्याचे आश्वासन दिले.

मुसलमान मते संघटित होत असतील तर भाजपला विरोध करणारे पक्ष एआयएमआयएमला भाजपची बी टीम म्हणतात. पण ते जेव्हा हिंदूंची मते फोडतात आणि तरीही भाजप जिंकून येते तेव्हा ते स्वतः भाजपची बी टीम नसतात का?, असा सवालही ओवैसी यांनी केला. मुस्लिमांना मतांच्या टक्केवारीनुसार प्रतिनिधित्व मिळत नाही असा त्यांचा दावा आहे. उत्तर प्रदेश च्या निमित्ताने त्यांनी उघडपणे तो मांडला आहे आणि त्यामुळेच भाजपच्या विरोधी पक्षांच्या पोटात गोळा उठला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: MIM Owaisi trying to dismantle Muslim Yadav vote bank in Uttar Pradesh Assembly Election 2022.

हॅशटॅग्स

#MIM(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x