21 November 2024 12:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 'या' राशींच्या व्यक्तींसाठी गुंतवणुकीकरिता आजचा दिवस ठरेल फायद्याचा; पहा तुमचे भविष्य काय सांगते Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा - NSE: SUZLON गौतम अदानींनी अधिकाऱ्यांना दिली 20 कोटींची लाच, गुंतवणूकदारांचीही फसवणूक'; अमेरिकेत गुन्हा दाखल IRFC Share Price | IRFC शेअर टेक्निकल चार्टवर फायद्याचे संकेत, स्टॉक ब्रेकआउट देणार, BUY रेटिंग - NSE: IRFC SBI Mutual Fund | 5000 ची SIP करून व्हाल डबल करोडपती, 5 वर्षांत अनेक पटीने वाढेल गुंतवणूक - Marathi News KPI Green Share Price | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, यापूर्वी 10390% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: KPIGREEN Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 1050 रुपये टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

भाजपमध्ये गेलेल्या लोकांना CBI, ED आणि आयकर विभागाचं संरक्षण आहे का? | आम्ही भाजप नेत्यांची यादी देतो - जयंत पाटील

Minister Jayant Patil

नगर, २९ सप्टेंबर | महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Minister Jayant Patil) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

Do people who have joined BJP have the protection of CBI, ED and Income Tax Department? We give a list of such people. What action will the ED take against them ?, minister Jayant Patil has asked :

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू आहे, असा आरोप करतानाच या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचं काय झालं? हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असं आवाहन पाटील यांनी केलं.

एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत, तो मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमीनीचा व्यवहार केला आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत. तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे, असा दावा त्यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला. त्यांनी पैसे घेतले नाही असं अधिकारी भुजबळ व संजय पाटील या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Minister Jayant Patil criticized BJP over ED politics against MahaVikas Aghadi leaders.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x