3 February 2025 3:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Govt Employees Salary | सरकारी कर्मचाऱ्यांचे 14 लाख रुपयेपर्यंतचे उत्पन्नही टॅक्स फ्री होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Vedanta Share Price | डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'ट्रेड वॉर'ने चिंता वाढली, मेटल क्षेत्रातील शेअर्स घसरले - NSE: VEDL SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना Income Tax e Filing | 12.5 लाख, 15 लाख आणि 20 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या पगारदारांनाही होणार फायदा, पहा किती JP Power Share Price | 14 रुपयांचा शेअर श्रीमंत करतोय, 2400 टक्के परतावा दिला, खरेदी करणार का - NSE: JPPOWER IPO GMP | झटपट कमाईची मोठी संधी चालून येतेय, 5 IPO लाँच होणार या आठवड्यात, प्राईस बँड डिटेल्स जाणून घ्या Senior Citizen TDS Limit | ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 1 लाख रुपयांचा फायदा, पैसे कसे वाचणार समजून घ्या
x

रावसाहेब दानवेंना जालन्यातून लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार: आमदार बच्चू कडू

जालना : भाजपचे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे ज्या लोकसभा मतदारसंघाच प्रतिनिधित्व करतात त्या जालन्याची अवस्था बिहारपेक्षा सुद्धा दयनीय असल्याची टीका करताना, आगामी निवडणुकीत दानवेंना जालन्यातून लोकसभा निवडणुकीत पराभूत करणार अशी गर्जना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

सध्या आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे. रावसाहेब दानवे यांनी वर्षभरापूर्वी शेतकऱ्यांचा साले असे उल्लेख करत त्यांच्यावर शेरेबाजी केली होती, अशी आठवण सुद्धा त्यांनी सर्वांना करून दिली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची जाहीर घोषणा सुद्धा केली आहे.

जालन्यातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना आमदार बच्चू कडू म्हणाले की, रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघाची अवस्था बिहारपेक्षा वाईट झाली आहे. येथे मोठ्याप्रमाणावर रेती तस्करी चालते तसेच बेकायदा दारू विक्रीमध्ये खासदार रावसाहेब दानवेंचा सहभाग आहे, असा थेट आरोप सुद्धा बच्चू कडू यांनी केला. त्यामुळे आगामी निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना पराभूत करणार असा एल्गार पुकारला आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x