5 November 2024 6:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राज्यात दंगली उसळतील: आमदार बच्चू कडू

अकोला : शेतकऱ्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकार जर असंच असंवेदनशील राहिल्यास दंगली उसळतील असा सज्जड इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. अकोला येथे आयोजित करण्यात आलेल्या मुक्काम मोर्चादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना आमदार बच्चू यांनी हे वक्तव्य केलं आहे. दरम्यान, यावेळी बोलताना शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालय जाळून टाकू, अशी धमकी सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे दिली आहे.

भाषणादरम्यान बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे देण्यास उशीर केल्याबद्दल फडणवीस सरकारला तिखट शब्दात धारेवर धरलं आहे. तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पुढच्या १५ दिवसांत शेतकऱ्यांच्या तुरीचे चुकारे द्या, अन्यथा अमरावतीचं विभागीय मार्केटिंग अधिकाऱ्याचं कार्यालयच जाळून टाकू.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने २० दिवसांची मुदत मागितली आहे. तर दुसरीकडे आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी केवळ ६ दिवसांचा अल्टिमेटम स्थानिक प्रशासनाला दिला आहे. १९ ते २४ नोव्हेंबर दरम्यान शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न निकाली काढावे असा अल्टिमेटम फडणवीस सरकारला देण्यात आला आहे.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(710)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x