अविनाश जाधव व MMRDA अतिरिक्त आयुक्तांची भेट, रखडलेल्या रांजणोली व मानकली उड्डाणपुलांचे काम सुरू होणार
ठाणे : MMRDA च्या माध्यमातून प्रस्तावित आणि मागील ५ वर्षांपासून रखडलेल्या रांजणोली-मानकोली या दोन उड्डाणपुलांचे काम या महिन्याच्या अखेरीस सुरु होणार असल्याचे आश्वासन MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळाला दिले आहे. मनसे ठाण्याचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत MMRDAचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांची भेट घेतली आणि बैठकीत सर्व विषय तसेच अडचणीचा पाढा वाचला.
सदर विषयाला अनुसरून अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी मनसेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर लवकर रखडलेल्या रांजणोली आणि मानकोली या दोन्ही उड्डाणपुलांचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच सविस्तर चर्चेदरम्यान इतर अडचणींचा सुद्धा पाढा अतिरिक्त आयुक्तांसोमर वाचण्यात आला आणि एका निवेदनाद्वारे कारवाई करण्याची विनंती सुद्धा केली.
अविनाश जाधव यांच्या सोबतच्या शिष्टमंडळाने खालील विषयात अतिरिक्त आयुक्तांनी लवकर हस्तक्षेप करून ते तडीस नेण्याची विनंती अतिरिक्त आयुक्तांना केली आहे. त्या बैठकातील ठळक विषय खालील प्रमाणे होते.
- सुप्रीम कंपनीचा ठेका रद्द करावा
- सुप्रीम कंपनीला काळ्या यादीत टाकून त्यांचे आर ए बील, बँक ग्यारंटी,इतर कोणतेच पेमेंट देऊ नये
- या कामासाठी तात्काळ नवीन ठेकेदार नेमावा
- कामाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात दिशा दर्शक लावावेत
- संबंधित दोन्ही कामाच्या ठिकाणी सर्व माहिती लावावी. उदा कामाचे नाव, कामाची रक्कम, कामाची मुदत, ठेकेदारचे नाव, संपर्क, अभियंत्यांचे नाव संपर्क
- कामाच्या ठिकाणी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वार्डन नेमावेत
- सदर कामाच्या तक्रारी निवारणासाठी कोण अधिकारी असणार आहेत त्यांचे नाव पद व संपर्क इत्यादी.
- दोन्ही कामाच्या ठिकाणी मोठया प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे तिथे दिवसातून 3 वेळा पाणी मारावे व लवकरात लवकर रखडलेल्या रांजणोली व मानकोली या दोन्ही उड्डाणपुलांचे काम सुरू करावे
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या शिष्टमंडळात ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या सोबत प्रदेश उपाध्यक्ष डी.के. म्हात्रे, संपर्क अध्यक्ष महेंद्र बैसाने, भिवंडी लोकसभा संघटक मदन पाटील, भिवंडी शहापुर जिल्हाध्यक्ष शैलेश बिडवी, मनविसे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष साळवी, महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना ठाणे जिल्हाध्यक्ष बालाजी गुळवी आणि ठाणे जिल्हा कायदेशीर सल्लागार ऍड. अरूण पाटील आदी पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर मालामाल करणार, मिळेल 57 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: RELIANCE
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर मालामाल करणार - NSE: TATATECH
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार - NSE: RVNL
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON