22 November 2024 12:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मनसेचा शिवसेनेला सवाल, ठाणे कोपरी पूल कोसळण्याची वाट बघत आहात का? अविनाश जाधव

MNS, shivsena, uddhav thackeray, raj thackeray, avinash jadhav, eknath shinde, thane, kopri bridge

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथील दुर्घटनेनंतर मुंबई आणि ठाण्यातील पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या कोपरी वाहतूक पुलाची अवस्था म्हणजे तो पूल कोणत्याही क्षणी कोसळू शकतो. हा पूल पूर्व द्रुतगती मार्गावर असून ठाणे येथील कोपरी विभागाच्या रेल्वे पटरीवरून वाहनांची ये जा करण्याचा हा एकमेव मार्ग आहे. असे असताना ठाण्याचे पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे कशाची वाट बघत आहेत? असा सवाल मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. तसेच हा पूल तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे.

२०१४ च्या निवडणुकीत आश्वासनांचा पाऊस पाडून सर्व सामान्य लोकांना मूर्ख बनवत सत्तेत आलेले युतीचे सरकार सगळ्याच स्तरावर फेल ठरत चालले आहे. दुर्घटना असतील कि शेतकऱ्यांचे प्रश्न, शिवसेना – भाजप सरकार हे सपशेल फेल ठरलं आहे अशी काहीशी सर्वसामान्य लोकांची प्रतिक्रिया आहे. आम्ही सत्तेत आलो कि महाराष्ट्र टोल मुक्त करू, झाला का महाराष्ट्र टोल मुक्त? याच पूर्व द्रुतगती मार्गावर रोज सकाळी आणि संध्याकाळी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. टोलचे सर्व नियम धाब्यावर बसवून सर्रास टोल वसुली केली जाते आणि आजू बाजूच्या नागरिकांना यामुळे प्रचंड ट्राफिक आणि प्रदूषणाचा सामना करावा लागतो.

गुरुवारी झालेल्या पूल दुर्घटनेत ६ लोकांचा मृत्यू झाला असून ३० पेक्षा अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. ह्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रशासनाने योग्य ती काळजी घ्यावी आणि योग्य ती उपाय योजना करावी. तर आणि तरच मुंबईकरांना न्याय मिळेल अन्यथा अशा घटना घडत राहतील आणि सामान्य मुंबईकरांचे प्राण जाताच राहतील.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x