11 January 2025 8:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, 8'वा वेतन आयोग जाहीर होणार, कर्मचाऱ्यांना मिळणार मोठी भेट Mazagon Dock Share Price | माझगाव डॉक शेअरमध्ये तेजीचे संकेत, प्रभूदास लीलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK Bonus Share News | फ्री बोनस शेअर्स देणार ही कंपनी, संधी सोडू नका, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ANANDRATHI Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर गुंतवणूकदारांना नुकसान, नवीन अपडेटचा स्टॉक प्राईसवर परिणाम होणार - NSE: RELIANCE IRB Infra Share Price | आयआरबी इन्फ्रा कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IRB NHPC Share Price | पीएसयू एनएचपीसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांकडून इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAPOWER
x

राज ठाकरे यांनी घेतली शहीद जवान सुनील ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट

कारंजा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून पक्ष विस्तारासोबत ते अनेक समाजसेवी संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्या समजून घेण्यावर सुद्धा भर देत आहेत. दरम्यान, काल त्यांनी शहीद जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच ढोपे कुटुंबियांच्या व्यथा जाणून घेतल्या.

कारंजा येथील जवान सुनील विठ्ठलराव ढोपे यांचा सिमा सुरक्षा दलात मेघालय राज्यातील शिलाॅंग येथे कर्तव्य बजावत असतांना १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यांनी मृत्यूपूर्वी आपल्या भावाशी संपर्क साधून माझ्या जिवास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून धोका असल्याची माहिती दिली होती. त्यावरून कारंजा तालुक्यातील वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले होते. सदर प्रकरणी सिमा सुरक्षा दलातील ५ जणांवर हत्येचा गुन्हा देखील दाखल झाला आहे. जवान सुनिल ढोपे मृत्यूप्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी मदतीचे आश्वासन राज ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिले आहे.

यावेळी सुनील ढोपे यांचे बंधू ज्ञानेश्वर ढोपे यांनी घडलेला सर्व प्रकार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कानावर घातला. त्यावर या प्रकरणाची सत्यता पडताळून ढोपे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण मदत करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. दरम्यान, या भेटीवेळी त्यांच्या समवेत पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, राज्य उपाध्यक्ष राजु उंबरकर आदी नेते उपस्थित होते.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x