21 November 2024 9:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

मनसे आगामी निवडणुका स्वबळावर लढणार : राज ठाकरे

सावंतवाडी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मनसे कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटी-गाठी तसेच सविस्तर चर्चेवर त्यांनी भर दिला आहे. येत्या २ महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याची कार्यकारीणी तयार करा आणि जोरदार पणे पक्षाचा विस्तार करा. कारण आगामी काळातील निवडणूक आपण स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी घोषित केलं.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची तसेच कार्यकर्त्यांची एका हॉटेलमध्ये गुप्त बैठक घेऊन मनसेच्या कार्यकर्त्याशी संवाद साधला तसेच त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्नं केला. या बैठकीत त्यांच्या सोबत माजी आमदार तसेच सरचिटणीस परशुराम उपरकर आणि शिरीष सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना राज ठाकरे म्हणाले की, आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. त्या दृष्टीने पक्ष बांधणीवर भर देण्यात आला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अगदी बुथपर्यत रिक्त असलेल्या कार्यकारिणी तात्काळ नेमण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी पधाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पक्ष पोहोचण्याचा प्रयत्न करून समाज माध्यमांचा चांगला उपयोग करा असं सुद्धा त्यांनी सूचित केलं आहे.

निवडणुकीत विजय हा केवळ पैशामुळेच मिळतो असं नाही. येणाऱ्या काळात स्थानिकांच्या मूळ समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नं करावेत आणि सामान्य लोकांपर्यंत पक्ष पोहोचवा असं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केलं. राज ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीला जिल्हाध्यक्ष धिरज परब, राजन दाभोलकर, चैताली भेंडे, श्रेया देसाई दत्ताराम गावकर, संदिप खानविलकर, अभिमन्यू गावडे, सुधीर राउळ, गुरूदास गवंडे, आशिष सुभेदार, मायकल लोबो, शशिकांत आईर, विनायक सावंत, नरेश देवूलकर, आनंद मयेकर, प्रमोद तावडे, ओकार कुडतरकर, विजय सावंत, परशुराम परब, आबा चिपकर, धनंजय शिरोडकर, राजा सावंत, आशिष जोशी हे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x