16 January 2025 2:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | म्युच्युअल फंड असावा तर असा, बिनधास्त गुंतवणूक करा, मिळेल करोडोत परतावा Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉकमध्ये तुफान तेजीचे संकेत, कंपनीबाबत अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल Reliance Power Share Price | 39 रुपयाच्या पॉवर शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RPOWER Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025
x

स्मारकावर २,२९० कोटी खर्च करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना! राज ठाकरे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींच्या “पुतळा” राजकारणावर व्यंगचित्रातून तोफ डागली आहे. ‘तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना’ असा रोखठोक सवाल त्यांनी केला आहे. गुजरातमधील नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा १८२ मीटर उंचीचा पुतळा उभारण्यासाठी तब्बल २,२९० कोटी रुपये इतका प्रचंड खर्च करण्यात आल्याने ते खुद्द वल्लभभाईंना तरी कसे पटेल?, असा रोखठोक सवाल मनसे अध्यक्षांनी विचारला आहे.

गुजरातमधील नर्मदा नदीजवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा लोखंड आणि तांबे यांच्या मिश्रणातून भव्य पुतळा उभारण्यात आला असून त्याची उंची तब्बल १८२ मीटर आहे. दरम्यान, नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर २०१३ मध्ये या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले होते. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या स्मारकाचे आता लवकरच लोकार्पण होणार आहे असं अधिकृत वृत्त आहे. परंतु, या भव्य पुतळा उभारताना तब्बल २२९० कोटी इतका प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे. देशात अनेक महत्वाचे गंभीर विषय असताना आणि सरकारकडे सुद्धा निधी उपलब्ध नसताना असे पैसे उधळण्याचा प्रवृत्ती राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं आहे.

सामान्य जनता महागाई सारख्या प्रश्नांनी होरपळत असताना भाजप सरकारची पैशांची उधळपट्टी न पटणारी आहे. एकूणच जिवंत माणसापेक्षा भाजपच्या पुतळ्याच्या राजकारणाचा राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून समाचार घेतला आहे. एकाबाजूला पैशाची वारेमाप उधळपट्टी करून नरेंद्र मोदी हे स्मारकाचे लोकार्पण करतील याप्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मनात काय भाव असतील? हे व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे. ‘केवळ तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी इतका अवाढव्य खर्च करुन आमचे पुतळे उभे करण्यापेक्षा आहेत ती जिवंत माणसं जगवा ना’ असे विचार वल्लभभाई पटेल यांच्या मनात येत असावे, असे या व्यंगचित्रात रेखाटण्यात आले आहे.

काय आहे नेमकं ते राज ठाकरे यांनी रेखाटलेलं व्यंगचित्र?

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x