18 April 2025 4:48 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

त्या जमिनीसाठी अवनीची हत्या? अनिल अंबानींसाठी देश विकायला काढला आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यवतमाळ येथे अवनी वाघिणीला ठार केल्याच्या प्रकरणावरुन फडणवीस सरकार आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. अवनी वाघिणीला ठार करण्याऐवजी तिला बेशुद्ध करायला हवं होतं, असं म्हणत राज ठाकरे यांनी अवनी वाघिणीला ठार करण्याचा निर्णय योग्य नव्हता असं म्हटलं आहे. केवळ पुतळे उभारुन देशभरात वाघांचं संवर्धन होऊ शकत नाही, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हीच गोष्ट जर गुजरातमध्ये सिंहांच्या बाबतीत झाली असती तर काय गोंधळ झाला असता, असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला. शिवाय, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय बेफिकीरपणे उत्तरं देतात. आणि ते वनमंत्री आहेत म्हणजे त्यांनी सर्वच समजतं असं मानण्याचं कारण नाही. त्यामुळे उद्या त्यांचं वनमंत्रिपद सुद्धा जाऊ शकतं, असे राज ठाकरे म्हणाले. दरम्यान, ज्या वाघिणीला यवतमाळ येथे ठार करण्यात आले आहे, तेथे सरकार अनिल अंबानींना जमीन देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे अनिल अंबानींसाठी संपूर्ण देश विकायला काढला आहे, असा अत्यंत गंभीर आरोप सुद्धा मनसे अध्यक्षांनी केला आहे.

विशेष म्हणजे अवनी वाघिणीला ठार मारल्यानंतर तिचे २ बछडे सुद्धा अनाथ झाले आहेत. एका जिवाला ठार केल्यानंतर आणखी २ जिवांना सरकारने मारल्याचं चित्र आहे. या सरकारला एकूणच सत्तेचा माज आला आहे. आणि आम्ही काही सुद्धा केलं तरी सगळं सहन केलं जाते, अशी त्यांची मानसिकता तयार झाली आहे. पण आता घोडा मैदान जवळ आहे, त्यामुळे सरकारला लवकरच कळेल आणि जनताच त्यांना धडा शिकवेल असं राज ठाकरे म्हणाले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या