27 April 2025 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | भरवशाचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RELIANCE Vikas Lifecare Share Price | 2 रुपये 55 पैशाचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE RVNL Share Price | मल्टिबॅगर पीएसयू कंपनीचा शेअर स्वस्तात खरेदी करा, अपसाईड टार्गेट प्राईस पहा - NSE: RVNL Gratuity on Salary | नोकरदारांनो, तुमच्या खात्यात ग्रेच्युटीची 1,38,461 रुपये रक्कम जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, SBI च्या या फंडात डोळे झाकून गुंतवणूक करा, 5 पटींनी पैसा वाढवा, सविस्तर जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Suzlon Share Price | सुझलॉन शेअर फोकसमध्ये; 6 महिन्यात 18% घसरला, आता अपडेट खुश करणार - NSE: SUZLON
x

आता विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल, राज ठाकरेंचा फडणवीसांना टोला

परभणी : मराठा समाजाच्या आक्रमक भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांनी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला न जाण्याचा निर्णय घेतला. तसेच निर्णय घोषित करते वेळी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या १० लाख वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आषाढी पूजेसाठी न जाण्याचा निर्णय घेत असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यांच्या या निर्णयाची आता खिल्ली उडवली जाऊ लागली आहे.

सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान ते परभणी येथे आले असता, आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमत्र्यांच्या या निर्णयाची खिल्ली उडवली आहे. राज ठाकरे प्रतिक्रिया देताना म्हणाले की,’आता विठ्ठलालाच तुमचे दर्शन नको असेल’, असे म्हणून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना चिंमटा काढला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना मनसे अध्यक्ष म्हणाले की, राज्यात थापा मारणारे मुख्यमंत्री असून इतकं खोटे बोलणारे सरकार कधी बघितलेच नव्हते. केंद्र व राज्यात या दोन्ही ठिकाणी आजपर्यंतचे सर्वात खोटे सरकार असल्याची टीका सुद्धा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या