21 February 2025 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 310% परतावा दिला - NSE: GTLINFRA IREDA Share Price | इरेडा शेअरमध्ये तुफान तेजी, अप्पर सर्किट हिट, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA TATA Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्समध्ये मजबूत तेजीचे संकेत, 89% कमाई होईल - NSE: TATAMOTORS Yes Bank Share Price | येस बँक शेअर ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, पुढे किती घसरणार स्टॉक - NSE: YESBANK EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी खुशखबर, आता UPI ने झटपट EPF चे पैसे काढता येणार, अपडेट जाणून घ्या Mutual Fund SIP | पगारदारांनो, 3, 4 आणि 5 हजारांची मासिक SIP सुरू करून 2.5 कोटींचा परतावा मिळवा, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा Business Idea | घरबसल्या होईल लाखोंची कमाई, या व्यवसायातून महिन्याला कमवाल हजारो रुपये, इथे जाणून घ्या योग्य माहिती
x

नाशिक मनसेत मोठे फेरबदल होणार | अशोक मुर्तडक समर्थक अनंता सूर्यवंशींच जिल्हाध्यक्ष पद जाण्याची शक्यता

Nashik Municipal corporation elections 2022

नाशिक, २३ सप्टेंबर | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे 22 सप्टेंबरपासून नाशिक (दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील पक्षसंघटनेत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाशिक मनसेत मोठे फेरबदल, अशोक मुर्तडक समर्थक अनंता सूर्यवंशींच जिल्हाध्यक्ष पद जाण्याची शक्यता – MNS Chief Raj Thackeray decided to change major changes in city president and district president of party :

आगामी महापालिका निवडणुकीसाठी मनसेने जोरदार तयारी सुरू केली आहे. यापूर्वी राज ठाकरे, अमित ठाकरे आणि पक्षांच्या इतर नेत्यांनी नाशिकमध्ये तळ ठोकला होता. आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शाखा अध्यक्षांच्या नियुक्तीवर राज ठाकरे मान्यतेचा ठसा उमटिवणार असल्याचे समजते. मनसेमध्ये शाखा अध्यक्ष हे सर्वात महत्त्वाचे पद असून, गेल्या महिन्यापासून या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

दरम्यान, नाशिक पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी पक्षात मोठा फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक शहराध्यक्षपदी दिलीप दातीर, जिल्हाध्यक्षपदी अंकुश पवार यांची निवड निश्चित करण्यात आली असून लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे समर्थक असलेल्या अनंता सुर्यवंशी यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Nashik Municipal corporation elections 2022)

फेब्रुवारी 2022 मध्ये 18 महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यात मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, पिंपरी-चिंचवड, पुणे, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर यांचा समावेश आहे. यामुळे मनसेसह अन्य पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत आहेत. पदाधिकारी बदलले जात आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray decided to change major changes in city president and district president of party.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x