21 November 2024 3:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | करोडपती बनण्याचा राजमार्ग; SIP चा 40x20x50 फॉर्म्युला जमा करेल 5 करोडोंची रक्कम - Marathi News
x

Nashik Municipal Elections 2022 | नाशिकसाठी मनसेचे दोन जिल्हाध्यक्ष तर शहर अध्यक्षपदी दिलीप दातीर

Raj Thackeray

नाशिक, २३ सप्टेंबर | आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी नाशिक शहर आणि जिल्हा संघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. हॉटेल एसएके सोलीटेयर येथे झालेल्या मनसे पदाधिकारी मेळाव्यात गुरुवारी (23 सप्टेंबर) ही यादी जाहीर करण्यात आली. त्यात नूतन पदाधिकाऱ्यांसह 122 नवनियुक्त शाखा अध्यक्षांची यादीही जाहीर करण्यात आली आहे.

Nashik Municipal Elections 2022, नाशिकसाठी मनसेचे दोन जिल्हाध्यक्ष तर शहर अध्यक्षपदी दिलीप दातीर – MNS Chief Raj Thackeray made major changes in Nashik party organization :

नाशिकला दोन जिल्हाध्यक्ष:
फेरबदलात नाशिक शहर अध्यक्षपदी दिलीप दातीर यांची वर्णी लागली आहे, तर अंकुश पवार यांची नाशिक जिल्हाध्यक्ष पदावर बढती झाली आहे. सोबतच अॅड रतनकुमार ईचम यांनाही जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. सचिन भोसले यांची शहर समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या नियुक्तीत नाशिक शहरातील सहाही विभाग अध्यक्षांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

मध्ये नाशिक मध्य विधानसभा विभाग अध्यक्षपदी नितीन साळवे आणि सत्यम खंडाळे, नाशिक पश्चिम विधानसभा विभाग अध्यक्षपदी रामदास दातीर आणि योगेश लभडे, तर नाशिक पूर्व विधानसभा अध्यक्षपदी भाऊसाहेब निमसे आणि विक्रम कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray made major changes in Nashik party organization.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x