5 November 2024 8:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेत जाऊन आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली आहे. या भेटी दरम्यान त्यांनी आयुक्तांसोबत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे नाव हे केवळ कोणाच्या तरी स्वार्थासाठी वापरले जात आहे. आज हे महापौर बंगला मागत आहेत, उद्या राज भवन सुद्धा मागतील. त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी जागा मिळू नये ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचं राज ठाकरे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

तसेच दादर शिवाजी पार्क येथील मुंबई महापालिकेच्या जिमखान्याचे आरक्षण उठवून तिथे महापौर निवासस्थान बांधण्याचा छुपा घाट मुंबई महापालिकेने घातला आहे. पण आम्ही या जिमखान्याच्या जागेवर महापौर बंगला बनू देणार नाही, असं राज ठाकरे यांनी आयुक्त अजोय मेहता स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, याच भेटीत त्यांनी मुंबईतील अनाधिकुत फेरीवाल्यांचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलन केल्यानंतर रेल्वेच्या दीडशे मीटर जागेत फेरीवाले बसणार नाहीत, असं सांगण्यात आलं होतं. परंतु, आता स्वतः मुंबई पालिकेतील वॉर्ड अधिकारी पैसे घेऊन तेथे फेरीवाल्यांना बसवत आहेत. तसेच पुन्हा ठाण मांडलेल्या या फेरीवाल्यांना हटविले नाही तर तीव्र आंदोलन करू, असे मुंबई पालिका आयुक्तांच्या भेटीनंतर त्यांनी स्पष्ट सांगितले आहे.

वॉर्ड अधिकारी सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश धुडकावून लावायला लागले आहेत आणि त्यानिमित्तानेच मी आयुक्तांची भेट घेऊन या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत असे राज ठाकरे म्हणाले. विशेष म्हणजे याच वेळी फेरीवाल्यांनी महापालिकेच्या आवारात आंदोलन पुकारले आहे. त्यात एका फेरीवाल्यानं महापालिकेच्या छतावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. परंतु, पालिकेच्या सुरक्षारक्षकांनी वेळीच हालचाल केल्याने पुढचा अनर्थ टळला आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x