14 November 2024 10:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेने राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स हटवले

Nashik Municipal corporation elections 2022

नाशिक, २३ सप्टेंबर | महाराष्ट्रातील महापालिकांमध्ये तीन वॉर्डांचा एक प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नाशिकवर लक्ष केंद्रीत केले असून मनसेप्रमुख राज ठाकरे हे पुत्र अमित ठाकरे यांच्यासह नाशिक दौऱ्यावर आले आहेत. मात्र, त्यांच्या स्वागतासाठी मनसैनिकांनी लावलेले फलक महापालिका प्रशासनाने काढून टाकले आहेत.

भाजपची सत्ता असलेल्या नाशिक महापालिकेने राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स हटवले – MNS Chief Raj Thackeray’ Nashik political tour before Municipal corporation elections :

२२ सप्टेंबरपासून राज ठाकरे हे अमित ठाकरेंसोबत २ दिवस नाशिक दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेले मोठे फलक महापालिका प्रशासनाने काढून टाकले. त्यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी नापसंतीचे ट्विट करून ‘रस्त्यावरचे फलक काढाल पण नाशिककरांच्या हृदयातून राजसाहेब आणि मनसे कशी काढाल?, असा प्रश्न विचारला आहे.

राज ठाकरे नाशिकमध्ये विभागप्रमुख आणि शाखाध्यक्षांचा मेळावा घेऊन त्यांच्याकडे प्रत्येक प्रभागाची जबाबदारी सोपविणार आहेत. सन २०२२ च्या फेब्रुवारी महिन्यात नाशिकसह राज्यातील १८ महापालिकांच्या पंचवार्षिक निवडणूक होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे, पुणे पाठोपाठ नाशिकमध्ये राज ठाकरे सक्रीय झाले आहेत.

जुलै महिन्यापासून राज ठाकरे यांनी नाशिक लक्ष केंद्रीत केले आहे. काही वर्षांपूर्वी आपला गड असलेले नाशिक परत मिळवण्यासाठी ठाकरे पितापुत्रांनी आपली शक्ती पणाला लावली आहे. युवा नेते अमित ठाकरे यांच्याकडे नाशिकची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अमित ठाकरेंनी शिवसेनेच्या शाखाप्रमुखाच्या धर्तीवर मनसेच्या शाखाध्यक्ष निवडीचा निर्णय घेतला आहे. अमित ठाकरे हे स्वतः शाखाध्यक्षांच्या निवड प्रक्रियेत लक्ष घालत आहेत.

मात्र, नाशिक महापालिकेवर भाजपची सत्ता आहे. राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर्स काढून मनसेला भाजप वेगळा राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यावर मनसे आता कशी प्रतिक्रिया देणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: MNS Chief Raj Thackeray’ Nashik political tour before Municipal corporation elections 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x