21 January 2025 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीने कमाई होणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये तेजीचे संकेत, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Vedanta Share Price | वेदांता शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर फोकसमध्ये आला - NSE: VEDL Vodafone Idea Share Price | 5 दिवसात 35% परतावा दिला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: IDEA Post Office Schemes | अत्यंत कमी बचतीत अधिक फायद्याच्या 3 पोस्ट ऑफिस योजना, गाव ते शहरात आहेत प्रसिद्ध Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर कंपनीबाबत अपडेट, 40 रुपयाचा शेअर मालामाल करणार- NSE: RPOWER Jio Recharge | जिओ युजर्सना धक्का, या रिचार्ज प्लानच्या किंमतीत 100 रुपयांनी वाढ, जाणून घ्या डिटेल्स
x

दुष्काळग्रस्त, तहानलेला महाराष्ट्र आणि अ'संवेदनशील' सरकार: व्यंगचित्र प्रसिद्ध

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून राज्यातील दुष्काळाने निर्माण झालेल्या पाणीटंचाईवर वास्तव मांडताना आजारी साखर कारखाने आणि त्यांना राज्य सरकारकडून देऊ केलेली आर्थिक मदत यावर भाष्य केले आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने राज्यात नोव्हेंबरपासूनच तीव्र पाणीटंचाई सुरु झाली आहे. असं असताना सुद्धा फडणवीस सरकार तहानलेल्या ग्रामीण महाराष्ट्राला मदतीचा हात पुढे करण्याऐवजी भ्रष्टाचाराने आजारी पडलेल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देत असून, साखर सम्राट आणि फडणवीस सरकारचं साटंलोटं असल्याचं व्यंगचित्रात दाखवले आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात एक तहानलेला शेतकरी पाण्यासाठी फडणवीसांकडे विनंती करत आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच्यावर ओरडत असून, त्याला थेट कोपऱ्यात जाऊन बसण्याच्या इशारा देत आहेत असं दाखविण्यात आलं आहे. विशेष म्हणजे फडणवीसांना त्यांनी संवेदनशील सरकार अशी उपमा व्यंगचित्रात दिली आहे. त्यात म्हटलं आहे की, “वा.. जा बघू, तिथे कोपऱ्यात जाऊन बस ! सारखी आपली पिरपिर पिरपिर, पाणी द्या पाणी द्या ! याला जरा शांतपणे गिळू देशील की नाही !,” असा साखर कारखान्यांकडे इशारा करत म्हणताना व्यंगचित्रात दिसतात.

काय आहे ते नेमकं व्यंगचित्र?

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x