22 November 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

नाना उद्दट वागतो, पण तो असं काही करेल हे मान्य नाही: राज ठाकरे

अमरावती : मनसे अध्यक्ष सध्या १० दिवसांच्या पश्चिम विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान काल त्यांची अमरावती येथे प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांना ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर ‘मी-टू’च्या माध्यमातून जे आरोप करण्यात आले त्यावर राज ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी उत्तर देताना म्हटलं की, नाना पाटेकर हा उद्दट वागतो हे मान्य पण तो असं काही करेल हे मान्य नाही असं म्हणत नाना पाटेकरांनी खंबीर पाठिंबा दिला आहे.

तसंच पुढे मत व्यक्त करताना ते असं सुद्धा म्हणाले की, पुरुषी अत्याचाराचा उल्लेख महिलांनी जरूर करायला हवा, परंतु असे आरोप तेव्हाच करायचा १० वर्षांनी नाही असं सुद्धा ते स्पष्ट म्हणाले. अमरावती येथील अंबा फेस्टिव्हल ट्रस्टच्या वतीने श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्याालयाच्या मैदानावर आयोजित प्रकट मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर आपली रोखठोक मते मांडली तसेच अनेक विषयांवर दिलखुलास उत्तर दिली.

तसेच चित्रपट सृष्टीमध्ये असं काही घडत असेलच तर तेव्हा लता मंगेशकर, आशा भोसले यांना सुद्धा असा त्रास झाला नसेल का?, १५ वर्षांची असतांना मी चित्रपट सृष्टीत आले तेव्हा एका कवीने त्यांना त्रास दिला डायरेक्टरने त्याला तेव्हाच काढले असे लता मंगेशकर यांनी माझ्या मुलाखतीत सांगितलं होतं, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उदाहरण म्हणून सांगितलं. त्यामुळे जेव्हा असा चुकीचा अनुभव येतो तेव्हा त्यावेळीच आवाज उठविणे गरजेचे आहे असं ते म्हणाले.

दरम्यान, ‘मी-टू’च्या माध्यमातून आज जे वातावरण पेटवले जात आहे, त्यातून अशा गंभीर प्रकरणातील गांभीर्यच निघून जाण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा अतिशय संवेदनशील विषयाची चेष्टा होता कामा नये असे मत मांडले. त्यामुळे नाना पाटेकर माझे चांगले मित्र आहेत, कधी-कधी ते उद्धटपणा करतात, पण त्यांनी तनुश्री दत्तासोबत अशी गैरवर्तणूक केली, हे मला मान्य नाही. परंतु अशा प्रकरणात प्रसार माध्यमांनी ‘ट्रायल’ घेऊ नये.

भारतीय न्यायालये अशी प्रकरणे हाताळण्यात सक्षम आहेत. कोण दोषी ते न्यायालयांना ठरवू द्याा, असे मनसे अध्यक्षांनी स्पष्ट करत न्यायालयीन व्यवस्थेवर विश्वास ठेवायला हवा असं मत मांडलं. सध्या देशात रुपयाचे अवमूल्यन, इंधन दरवाढीमुळे भडकलेली महागाई यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी या ‘मी-टू’ मोहिमेचा उपयोग केला जात आहे का असं म्हणत सत्ताधारी भाजप काहीही करू शकते, असा टोला त्यांनी लगावला.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x