15 January 2025 7:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, बँकेबाबत फायद्याची अपडेट, रिपोर्ट जारी - NES: YESBANK EPFO Passbook | पगारदारांसाठी EPFO ची नवीन सेवा, EPF रक्कम लवकरात लवकर काढता येणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी स्टॉक तेजीत, गुंतवणूकदारांची मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2025 Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
x

राज ठाकरे रोखठोक पणे मराठीची व्याख्या थेट उत्तर भारतीयांच्या मंचावर मांडणार

मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची उत्तर भारतीय महापंचायतने १२ ऑक्टोबर रोजी भेट घेऊन कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. दरम्यान, ते निमंत्रण त्यांनी स्वीकारल्याची अधिकृत माहिती पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून दिली आहे. त्यामुळे २ डिसेंबर रोजी कांदिवलीच्या भुराभाई हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमाला स्वतः राज ठाकरे संबोधित करून पक्षाची भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता आहे.

मुंबई आणि महाराष्ट्रात उत्तर भारतातून रोजच्या रोज प्रचंड लोंढे येत असतात आणि साहजिकच त्याचा ताण शहरातील आणि राज्यातील पायाभूत सुविधांवर पडतो. त्यामुळे राज ठाकरे यांनी नेहमीच या लोंढ्यांना आवर घालण्यासाठी रोखठोक भूमिका घेतली आहे. परंतु, मूळ विषय समजून घेण्यापेक्षा प्रसार माध्यमांनी नेहमीच चुकीच्या पद्धतीने हा विषय सामान्यांसमोर मांडला, असं राज ठाकरे यांनी अनेकवेळा त्यांच्या भाषणात बोलून दाखविले आहे. एकप्रकारे उत्तर भारतीयांमध्ये ती प्रतिमा माध्यमांनी तयार केल्याचा आरोप त्यांनी नेहमीच केला आहे.

गुजरात मधील घटनेनंतर कदाचित उत्तर भारतीयांना महाराष्ट्र आणि मराठी माणूस त्यातल्या त्यात किती समजून घेणारा आहे याचा प्रत्यय आला असावा. राज ठाकरे नेमका हाच मुद्दा उपस्थित करून उत्तर भारतीय आणि बिहारीं समाजापुढे नरेंद्र मोदींना कात्रीत पकडतील अशी शक्यता आहे. तसेच राज ठाकरेंनी आणि महाराष्ट्र सैनिकांनी उत्तर भारतीयांविरोधात एखादी छोटीशी प्रतिक्रिया दिल्यावर सुद्धा देशभरातून तुटून पडणारे उत्तर भारतीय नेते, मग त्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, रामविलास पासवान, लालू यादव, समाजवादी पक्षाचे नेते आणि मायावती हे सर्वजण गुजरातमधील घटनेनंतर का गप्प बसून राहिले? असा खडा सवाल राज ठाकरे उपस्थित करून त्यांचं तुमच्यावरील प्रेम हे केवळ मंतांसाठी आहे, हे दाखवून देण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेकवेळा उत्तर भारतीयांना अद्दल घडवली आहे. परंतु क्रूर पणे आणि ठार मारण्याचे उद्योग त्यांनी सुद्धा केले नाहीत, जे गुजरात आणि आसाम सारख्या राज्यात झाले. वास्तविक मनसे बद्दल प्रसार माध्यमांनी कसा एक कलमी कार्यक्रम राबवून हे चित्र निर्माण केलं याचा खुलासा राज ठाकरे करतील अशी शक्यता आहे. तसेच या सर्व गोष्टी असल्या तरी महाराष्ट्र, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी संस्कृती आणि प्रथम इथल्या रोजगारावर असलेला मराठी मुला-मुलींचा अधिकार उत्तर भारतीय समाजाला मान्य असेल तर तुमचा विचार केला जाईल, असे राज ठाकरे यांनी रोखठोकपणे ठणकावल्यास नवल वाटायला नको.

उत्तर भारतीयांच्या मुद्यावर राज ठाकरेंनी त्यांचे विचार मांडावेत. यामुळे अनेक गैरसमज दूर होतील,’ असा विश्वास उत्तर भारतीय महापंचायतीचे सदस्य विनय दुबे यांनी यांनी राज यांना निमंत्रणपत्रिका दिल्यावर व्यक्त केला होता. त्यामुळे राज ठाकरे जरी उत्तर भारतीय समाजाच्या मंचावर उपस्थिती लावणार असतील तरी ते तिथे आम्ही उत्तर भारतीय गोष्टी स्वीकारतो, असं बोलण्यापेक्षा तुम्ही मराठीचा स्वीकार करा त्यांनेच प्रश्न सुटतील, असाच थेट संदेश राज ठाकरे देतील अशी शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x