22 January 2025 3:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, मजबूत परतावा मिळेल - NSE: NTPC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE Top Up SIP | पगारदारांनो SIP गुंतवणूक नाही तर Top Up SIP करून बंपर परतावा मिळवा, पैशांचा पाऊस पडेल Jio Finance Share Price | नव्या व्यवसायात जिओ फायनान्शियल कंपनीचा प्रवेश, तज्ज्ञांचा शेअर्सबाबत महत्वाचा सल्ला - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा टेक सहित या 6 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATATECH IPO GMP | आला रे आला IPO आला, संधी सोडू नका, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, फक्त 14,700 गुंतवून एंट्री घ्या Nippon India Small Cap Fund | पगारदारांनो गुंतवणूक 4-5 पटीने वाढवायची आहे, या फंडात डोळेझाकुन पैसे गुंतवा, करोडोत कमाई
x

विद्यमानांना अप्रत्यक्ष 'आर्थिक निरक्षर' संबोधत राज ठाकरेंच्या डॉ. मनमोहन सिंग यांना शुभेच्छा

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी समाज माध्यमांवरून देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ८६ व्या वाढदिवसाच्या शुभेच्या देताना बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीवरून नाव न घेता मोदींना टोला लगावला आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांवर आणि समाज माध्यमांवर या शुभेच्छा चांगल्याच झळकत आहेत.

भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आज ८६ वा वाढदिवस असल्याने त्यांना वाढदिवसानिमित्त विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा ट्विटर आणि फेसबुकच्या माध्यमातून डॉ. मनमोहन सिंग यांना ठाकरे शैलीत शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना राज ठाकरे यांनी मनमोहन सिंग यांच्या अर्थव्यवस्थेतील योगदानाचे आवर्जून कौतुक केलं आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीच कौतुक करताना राज ठाकरेंनी म्हटलं आहे की, देशाला आर्थिक उदारीकरणाच्या वाटेवर यशस्वीपणे नेणारे, माजी अर्थमंत्री आणि पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या आज वाढदिवस. १९९१ नंतरच्या आर्थिक उदारीकरणाची फळं ज्यांनी चाखली, त्याच वर्गाने डॉ. मनमोहन सिंग ह्यांची निर्भत्सना करण्यात काही काळ पुढाकार घेतला होता.

पण, देशाची अर्थव्यवस्था “आर्थिक निरक्षरांनी” गर्तेत ढकलली असताना, माझ्या सकट, तमाम भारतीयांना तुमच्या ज्ञानाची उणीव नक्कीच भासत आहे. अर्थमंत्री असताना असेल किंवा पंतप्रधान असताना असेल, तुम्ही देश ज्या पद्धतीने आर्थिक संकटातून बाहेर काढलात त्याचं महत्व, आजच्या आर्थिक अराजकतेच्या काळात जाणवत आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुढे राजकीय प्रगल्भता दाखवत राज ठाकरे यांनी असं सुद्धा म्हटलं आहे की, ‘राजकारणात टीका होतच असते, ती कधी काळी आम्ही पण केली. पण चांगल्या गोष्टींचं कौतुक करण्याचं औदार्य आमच्याकडे नक्कीच आहे’. डॉ. मनमोहन सिंग ह्यांच्या भाषणातलाच एक संदर्भ घेऊन म्हणेन ” इतिहास तुमच्या कार्याचं आणि योगदानाचं नक्कीच योग्य मूल्यांकन करेल’ असेही राज ठाकरे यांनी शुभेच्छा देताना म्हटलं आहे. विद्यमान सरकारला “आर्थिक निरक्षर” संबोधत मनसे अध्यक्षांनी दिलेल्या ह्या शुभेच्छा मोदी सरकारच्या चांगल्याच जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x