20 April 2025 12:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो, ही फंडाची योजना गुंतवणूकदारांचे पैसे 4 ते 5 पटीने वाढवत आहे, इथे पैसा वाढवा Horoscope Today | 20 एप्रिल 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Kalyan Jewellers Share Price | सोनं नव्हे, सोनं बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स खरेदी करा, झपाट्याने पैसा वाढेल - NSE: KALYANKJIL Mishtann Foods Share Price | 5 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - BOM: 539594 Motherson Sumi Wiring Price | शेअर प्राईस 52 रुपये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, किती परतावा मिळेल पहा - NSE: MSUMI Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 20 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Bajaj Finance Share Price | लाखो टक्क्यांमध्ये परतावा देणारा शेअर, आता पुढची टार्गेट प्राईस ही आहे - NSE: BAJFINANCE
x

अवनी'च्या हत्येनंतर? नाही! राज ठाकरेंची ती तळमळ जुनी आहे: सविस्तर

ताडोबा : अवनी वाघिणीला नरभक्षक ठरवून तिला ठार मारण्यात आल्याने देशभर संतापाची लाट उसळली असताना अनेक स्तरावरून प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मनुष्य प्राणी स्वतःच्या सीमारेषा ओलांडून जंगलांपर्यंत वास्तव्य पसरवू लागल्याने मनुष्यावर प्राणी असे हल्ले करतंच राहतील हे सत्य आहे. त्यासाठी यवतमाळचं जंगल कशाला अगदी मुंबईसारख्या शहरातील संजय गांधी नॅशनल पार्कच्या आजूबाजूच्या वस्त्यांमध्ये बिबट्यांचे हल्ले झालेले पाहायला मिळत आहे. परंतु, त्यात प्राण्यांनाच नरभक्षक ठरवून ठार केले जाते. परंतु, तस्करीसाठी मनुष्य प्राणी सुद्धा अधिकाऱ्यांच्या संगनमताने जंगलात शिरून याच वाघांची हत्या करून त्यांची कातडी आणि नखे लाखो-करोडो रुपयांना विकून स्वतःचे खिसे भरतात हे सुद्धा वास्तव आहे. परिणामी देशात वाघांची संख्या झपाटूणे कमी होत असून तो देशातील एक दुर्मिळ प्राणी होईल अशी परिस्थिती आहे.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच राज्यसरकार आणि वनमंत्र्यांना या विषयावरून चांगलेच खडे बोल सुनावले. परंतु. राजकीय नेत्यांचा बाबतीतच बोलायचे झाल्यास अवनी वाघिणीच्या मुद्यावरून राजकीय व्यक्ती आताच राजकारणासाठी आणि विद्यमान सरकारवर टीका करण्यासाठी जागे झाले का? असा मुद्दा सुद्धा अनेकांनी उपस्थित केला होता. परंतु, राज ठाकरे यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्यांनी याआधी अशा गंभीर विषयावर प्रत्यक्ष दौरे करून हा विषय स्वतः समजून घेतला होता. साल २०१२ मध्ये अशीच ताडोबाच्या जंगलात वाघाच्या शिकारीच प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं होत. त्यावेळी म्हणजे काँग्रेस सरकारच्या काळात शिकारीच वाढत प्रमाण आणि शासनाची त्यावरची हतबलता बघून राज ठाकरे यांनी ताडोबाच्या जंगलाचा दौरा केला होता.

त्या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्वतः ताडोबाच्या जंगलात जाऊन वाघाच्या शिकारी साठी लावले जाणारे ट्रॅप आणि वाघाला अडकवण्यासाठी केले जाणारे प्रयोग वन अधिकाऱ्याकडून सविस्तर समजवून घेतले होते. त्यानंतर त्यावर अधिकाऱ्याना काही सूचना देखील केल्या होत्या. सर्व विषयाची पाहणी करून परत विश्रामगृहावर आल्या वर त्यावेळच्या काँग्रेस – राष्ट्रवादी सरकार वर त्यांनी तुफान हल्ला बोल केला होता आणि तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांच्यावर सुद्धा सडकून टीका टीका केली होती. त्यामुळे अवनी वाघिणीच्या विषयाला अनुसरून विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि भाजपवर टीका करण्याची संधी असा आरोप हा राज ठाकरेंच्या बाबतीत तरी फोल ठरेल.

विषय त्यावेळी आघाडी सरकारला झोडपून काढण्याइतका नव्हता तर त्याच दौऱ्यादरम्यान त्यांनी जो कोणी वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला पकडेल त्याला ५ लाखाच बक्षीस जाहीर केलं होत. त्यांनतर वर्षभरानंतर पुन्हा २०१३ साली दुष्काळ दौऱ्यावर गेल्या नंतर परत त्या जागेची पाहणी केली आणि त्यावेळी एका टोळीला काही पोलीस आणि ग्रामस्थानी पकडलं होतं, त्यांना तो ५ लाखाचा धनादेश त्यांनी सुपूर्द केला होता. अगोदरच दुष्काळ असल्यामुळे माणसा प्रमाणे जंगलात वन्य प्राण्यांचे पाण्याविना हाल होत होते. त्यावेळी आपल्या पदाधिकाऱ्याना सूचना देऊन जंगलातील छोट्या-छोट्या तळ्यामध्ये टँकरने पाणी सोडायला सांगितलं होतं आणि त्यानुसार पुर्ण उन्हाळा ते पदाधिकारी २ दिवसातून एकदा त्या तळयामध्ये पाणी सोडत असत.

सांगायचा मुद्दा इतकाच की महाराष्ट्राच्या प्रत्येक प्रश्नावर एवढ्या अभ्यासपूर्ण आणि कृतीतून राज ठाकरे मागील कित्येक वर्षे बोलत आले आहेत. त्यांच्यासाठी विषय काँग्रेस किंवा भाजप असा नसून तर विषयाच गांभीर्य अधिक महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांना ते खऱ्या अर्थाने विस्तृत अभ्यास करून मांडत आले आहेत, परंतु सामान्यांचा अशा विषयावरील नकारात्मक दृष्टिकोन हा विद्यमान आणि ढोंगी राजकारण्यांच्या पथ्यावर पडतो आणि अवनी सारख्या घटना घडतच राहतात आणि राज ठाकरेंसारखा प्रामाणिक वास्तव मांडणारा नेता “राजकारणाच्या आकडेवारीत” दुर्लक्षित राहतो हे त्रासदायक आहे.

काय होता तो दौरा नक्की?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या