21 April 2025 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

लोकसभा निवडणूक: राज ठाकरेंचा निर्णय विचाराअंती झाला तरी काय असतील परिणाम? सविस्तर

MNS, Tulsi Joshi, Raj Thackeray

मुंबई : सध्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच पक्षातील वातावरण तापू लागलं आहे. अनेक पक्षांमधील वाटाघाटी पूर्णत्वाला येऊन ठेपल्या आहेत, त्यात अनेकांनी उमेदवार देखील घोषित करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, मनसे किव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष आगामी निवडणुकीत नक्की काय भूमिका घेणार यावर माध्यमांमध्ये चर्चा रंगल्या आहेत. वास्तविक प्रसार माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांना स्वतः राज ठाकरे, अधिकृत प्रवक्ते आणि वरिष्ठ नेत्यांकडून कोणताही दुजोरा मिळालेला नाही आणि त्यामुळे जर तरच्या चर्चांना काहीच अर्थ उरत नाही.

मनसेकडून काहीच निश्चित झालं नसलं तरी मागच्या २ दिवसातील बातम्यांमधून कार्यकर्त्यांमध्ये नक्कीच संभ्रमाचं वातावरण पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे जो निर्णय घेतील तो संपूर्ण विचाराअंती घेतला गेला तरी, त्याचे चांगले आणि वाईट परिणाम होतील हे निश्चित आहे. त्यातील पहिला म्हणजे असं समजू की मनसे लोकसभा लढवणार, मग त्या आघाडीतून असो किंवा स्वबळावर, पण कार्यकर्त्यांना पुढच्या २ महिन्यासाठी एक कार्यक्रम मिळणार हे निश्चित आहे. वास्तविक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी फळी मनसेकडे असताना, पक्षाने लोकसभा लढवावी का? की लढवू नये? असे प्रश्न उपस्थित होणे म्हणजे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर अविश्वास असंच म्हणावं लागेल. कारण जिंकण्यापेक्षा आपण हरलो तर? यावरचर्चा अधिक होताना दिसत आहे.

वास्तविक जे प्रश्न राजू शेट्टी, नारायण राणे, ओवेसी, प्रकाश आंबेडकर किंवा इतर छोट्या मोठ्या पक्षांच्या नेत्यांना पडत नाहीत ते राज ठाकरे यांना का पडतात हाच मुळात कळीचा मुद्दा बनला आहे. इतर सर्व पक्ष केवळ स्वतःच्या पक्षाचा स्वार्थ बघत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे इतर कोणत्याही गणितात का गुरपटात हाच प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. माझा पक्ष इतक्या जागा लढवणार आणि त्या आम्ही संपूर्ण ताकदीनिशी निवडून आणणार यावरच चर्चा खुले आम केल्यास पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा ताकदीने पेटून उठतील. ५ वर्ष मित्र पक्ष भाजपसोबत वेगळी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे कोणताही मागचा पुढचा विचार न करता निवडणुकीच्या काही दिवस आधी १०० टक्के पलटले आणि त्याला कारण म्हणजे केवळ स्वतःच्या पक्षाचा स्वार्थ दुसरं काही नाही. राजकारणात तेच महत्वाचं असतं.

दुसऱ्या बाजूला आघाडीतील इतर पक्ष रोज उठून मनसेबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असताना, मनसेतील वरपासून खालपर्यंत सगळेच केवळ एखाद्या मोठ्या इव्हेंटमध्ये उत्तर देण्याची वाट पाहत बसले आहेत. याआधी ब्लूप्रिंट’च्या इव्हेंटने दगा दिलेला असताना पक्ष अजून सर्व भूमिका इव्हेन्टमधूनच देण्याची वाट पाहत आहे आणि त्यामुळेच पक्षात प्रवक्ते नावाचा काही विषय आहे किंवा नाही हेच उमगत नाही. इव्हेंटमध्ये एखादी घोषणा केल्याने हवानिर्मिती होते हा पक्षाचा समज अजून पुसला गेलेला नाही हेच यामधून समोर येतं. पोषक वातावरण असताना इतर पक्ष त्यांच्यासोयींच्या भूमिका मनसेबद्दल देत असताना, मनसेकडून उत्तर देण्यासाठी वर्धापनदिनापर्यंत थांबणे म्हणजे २०१४ मध्ये काहीच धडा घेतला नाही असं म्हणावं लागेल. सध्या पेड माध्यमांचा सुळसुळाट सुरु असताना ते मनसेवर केंद्रित राहतील हा मोठा गैरसमज आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना तुम्ही कामाला लागा असे आदेश देण्याऐवजी आघाडीबाबतची अनिश्चितता स्वतः मनसेनेचे इव्हेंट बनवली आहे. कारण तसे आदेश दिले असते तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये ताकद आली असली आणि ते जोमाने कामाला लागले असते.

उलटपक्षी असं समजू की, जर मनसेने लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला तर ती मनसेची सर्वात मोठी राजकीय चूक ठरेल. कारण त्यामुळे पुढच्या २ महिन्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नक्की काय करायचं? स्वतः पक्षाध्यक्षांनी काय करायचं त्या काळात? समाज माध्यमांवर इतरांचा प्रचार करायचा का? कारण स्वतःचे उमेदवाराचं नसतील तर हे सर्व कोणासाठी करायचं? त्यात मोदी मुक्त भारताची घोषणा देऊन स्वतःच निवडणुकीच्या रिंगणातून दूर राहायचं हे न समजण्यापलीकडचं आहे. इतर पक्षांमधील अनोळखी नेते मंडळी मीच खासदार होणार अश्याच अविर्भावात फिरत असताना, सामान्यांच्या मदतीला धावणारे आणि ओळखीच्या मनसे पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी हाताची घडी घालून पाहत राहायचं का? असे अनेक प्रश्न निर्माण होतील. परिणामी, जर ग्रामपंचायत ते लोकसभा निवडणुकीपर्यंत असाच कल ठेवायचा तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष स्वतःच्या विभागात का वाढवावा असे प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे.

जर लोकसभेच्या आडून मनसे विधानसभेची गणितं आखत असेल तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. कारण लोकसभा न लढविण्याचा अर्थ स्वतःच्या पक्षाची विधानसभा निहाय ताकद नसल्याचं अप्रत्यक्षरित्या स्वीकार करणे असा देखील होतो. त्यात लोकसभा न लढवण्याचा निर्णयाचे इतके राजकीय फटके पडतील की ते विधानसभेला देखील भरून येणार नाहीत आणि परिणामी विधानसभा अजूनच कठीण जातील. कारण एकहाती सत्ता द्या असं सांगून पक्ष उद्या विधानसभेच्या ५०-६० जागा लढविण्यास जरी सज्ज झाला तरी एकूण उमेदवारांचा आकडा पाहून तेच टीकेचे धनी ठरतील. त्यामुळे राज ठाकरेंनी जर तर आणि इतर पक्षांच्या भरोशे भविष्यातील कोणतीही पेरणी करू नये आणि विश्वास तर अजिबात टाकू नये, पदाधिकारी आणि आक्रमक कार्यकर्त्यांच्या जोरावर थेट लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवावी आणि पक्ष स्वार्थी दृष्टिकोनातून वाढवावा हेच हिताचं ठरेल. कारण उद्या त्या मित्र पक्षांची राजकीय समीकरणं बदलली तर ते विधानसभेत पलटतील आणि ते त्यांच्या सोयीची भूमिका घेतील आणि राज ठाकरे पुन्हा तोंडघशी पडतील. त्यामुळे इतरांचा राजकीय स्ट्राईक करता करता आपलाच राजकीय स्ट्राईक होणार नाही ना? याची आधी खात्री करणे गरजेचे आहे. कारण चांगलं पोषक वातावरण पक्षासाठी असताना आणि समोर भरलेलं अन्नाचं ताट असताना ते दुसऱ्याची राजकीय भूक मिटवण्यासाठी वापरलं, तर आपण भुकेले राहणार आहोत हे आधी स्वीकारावं लागेल.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या