23 January 2025 9:22 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
New Income Tax Regime | खुशखबर, 10 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना गिफ्ट, 1 रुपयाचाही टॅक्स भरावा लागणार नाही EPF Pension Money | खाजगी नोकरदारांना EPFO कडून इतकी महिना पेन्शन मिळणार, रक्कम फॉर्म्युला जाणून घ्या Rattanindia Power Share Price | 12 रुपयांचा पॉवर कंपनीचा शेअर तेजीत, कंपनीने महत्वाची अपडेट दिली - NSE: RTNPOWER Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर खरेदी गर्दी, 1 दिवसात 9 टक्क्यांनी वाढला, मालामाल करतोय शेअर - Penny Stocks 2025 IRFC Share Price | आयआरएफसी शेअरबाबत महत्वाचे संकेत, शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर 34 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की SELL - NSE: RVNL Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, रेटिंग अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL
x

VIDEO: फडणवीस साहेब! गेले ते 'शेर'चे दिवस, ही असेल २०१९ मध्ये 'शेर'ची अवस्था

मुंबई : काल मुंबईमध्ये पार पडलेल्या एका पक्षाच्या कार्यक्रमात मुंबई मुख्यमंत्री फडणवीस उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर शेलक्या भाषेत तुटून पडले. त्यावेळी देशभरातील विरोधकांबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मोदीजी जंगल का शेर है, बाकी अपने अपने गली मे कुत्ते-बिल्ली है’. हा शेर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांच्या दांडय़ा उडविल्याशिवाय राहणार नाही. त्यानंतर विरोधकांवर चोर, कोल्हे, जनावरे, अशा शेलक्या शब्दांत टीकेची झोड उठविली.

परंतु, मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आणि कट्टर राज ठाकरे समर्थक तुलसी जोशी यांनी, त्यांच्या फेसबुक पेजवरून एक व्हिडिओ शेअर करत २०१९ मध्ये विरोधकांच्या एकीने ‘शेर’ची अवस्था अशीच होणार असा थेट संदेश दिला आहे. तुलसी जोशी यांनी शेअर केलेला व्हिडिओ पाहून मात्र नेटकऱ्यांचं हसू आवरणार असंच प्रथम दर्शनी दिसतं आहे.

फडणवीसांच्या मोदींबद्दलच्या ‘शेर’ प्रतिक्रियेला उत्तर देताना तुलसी जोशी यांनी एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे, ‘फडणवीस साहेब! गेले ते जंगलातील ‘शेर’चे दिवस. इथे चार रान रेडे आणि म्हशीसुद्धा एकत्र येऊन त्या ‘शेर’ आणि स्वतःला जंगलाचा राजा समजणाऱ्या उन्मत्त प्राण्याची पुंगी वाजवून जातात. आणि हो सध्या ‘शेर, वाघ, चिते’ या प्राण्यांची संख्या सुद्धा झपाट्याने घटते आहे. इथे शहरात सुद्धा ४-५ कुत्रे एकत्र येऊन बिबट्याला पळवल्याची उदाहरणं पण आहेत. पण विरोधकांना कुत्रे संबोधलात तरी कुत्रा नावाचा प्राणी इमानी असतो याची नोंद घ्यावी. काही दिवसापूर्वी अवनी नावाच्या वाघिणीला थेट ठार करण्याचे आदेश सुद्धा तुमच्या प्रशासनाने दिले होते. कारण काय दिलं तर ती नरभक्षक होती. चला ते जरी एका बाजूला स्वीकारलं तरी सध्याच्या सरकारची धोरणं सुद्धा अनेक शेतकऱ्यांना ४५,००० रुपयांच्या कर्जावरून भक्ष करत आहेत आणि ४५,००० कोटींचा बोजा डोक्यावर असून सुद्धा उद्योगपती मात्र टुणटुणीत होत आहेत ते न समजण्या पलीकडचं आहे. असो बाकी आम्हाला प्राणी प्रेम शिकवू नका, कारण आमच्या राज साहेबांकडून आम्ही प्राण्याचं महत्व आणि त्यांच्या बद्दलचा जिव्हाळा जाणतो. त्यामुळे ‘शेर-वाघ-चिते’ यांची काळजी असेल तर राज्याच्या जंगलातील प्राण्यांचे जतन करून पर्यटन कसं वाढेल ते मुनगंटीवारांना समजवा. या लोकशाहीत केवळ एकच राजा आहे…. आणि ती म्हणजे ‘प्रजा’. तीच प्रजा या उन्मत्त झालेल्या तसेच स्वतःला लोकशाहीचा राजा आणि ‘शेर’ समजू लागलेल्यांची २०१९ मध्ये एकत्र येत लोकशाहीमार्गाने आणि मतदानाच्या हत्याराने शिकार करेल हे निश्चित आहे.

काय आहे ती नेमकी पोस्ट? वाचा फेसबुक पोस्ट

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x