18 April 2025 5:41 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | पैसे बचत करून वाढणार नाहीत, तर अशाप्रकारे स्मार्ट बचत करून वाढवा, मिळेल 1 कोटी रुपये परतावा Gratuity Money Alert | तुमचा पगार किती आहे? तुमच्या शेवटच्या पगारानुसार कंपनी एवढी ग्रॅच्युटी रक्कम देणार, अपडेट जाणून घ्या EPFO Money Alert | खाजगी कंपनी पगारदारांसाठी अपडेट, EPFO खात्यातून 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट काढता येणार Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS
x

VIDEO: तुलसी जोशींचा दणका; शिवसैनिकाचे पैसे बिल्डरने परत केले, शिवसैनिकाने मानले राज ठाकरेंचे आभार

MNS, Tulsi Joshi, Raj Thackeray

पालघर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पालघरचे कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक तुलसी जोशी हे शक्य असलेल्या मदतीसाठी सामान्य मराठी माणसाला कधीच नाही बोलप्रत्येक त नाहीत, याची अनेक उदाहरणं प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पाहिली आहेत. परंतु विषय आर्थिक अडचणीत सापडलेल्या शिवसैनिक आणि त्यांच्या सामान्य कुटुंबियांशी संबंधित असल्याने विषयाला वेगळेच महत्व प्राप्त होते.

मुंबई वरळी कोळीवाडा येथे राहणारे शिवसैनिक शरद कडू आणि त्यांच्या पत्नी निकिता कडू यांनी कष्टाच्या पैशाने स्वतःचे घर घेण्यासाठी एका प्रकल्पात बुकिंगसाठी सुरुवातीला पावणे तीन लाख २०१२ मध्ये मोठ्या आशेने गुंतवले होते. दरम्यान, मागील अनेक वर्षांपासून संबंधित प्रकल्प मार्गी लागला नाही आणि कष्टाचे पैसे देखील ५ वर्षांपासून संबंधित बांधकाम व्यवसायिक परत देत नव्हता. शरद कडू यांच्या कुटुंबाने अनेक वर्ष त्यांना ३ महिन्याने या किंवा सहा महिन्याने या असे करत ५-६ वर्ष झुलवत ठेवले होते. विशेष म्हणजे शिवसेना सत्तेत असल्याने आणि स्वतः शिवसैनिक असल्याने त्यांनी अनेक शिवसेना पदाधिकाऱ्यांना मदत करण्यासाठी भेटीगाठी घेतल्या. मात्र सर्वांनी त्यांच्या अडचणींकडे कानाडोळा केला आणि बिल्डरने तसेच शिवसैनिकांनी देखील त्यांना न्यायालयात जाण्याचे फुकटचे सल्ले दिले. आपले कष्टाचे पैसे बुडाले अशीच भावना त्यांच्या कुटुंबियांच्या मनात निर्माण झाली होती.

कंटाळलेल्या अवस्थेत ते भिवंडी येथील संबंधित बांधकाम व्यावसायिकांच्या कार्यालयात गेले आणि शेवटची विनंती केली. परंतु, तिथे जाण्यापूर्वी त्यांनी समाज माध्यमांवरून मनसेचे पालघरचे कार्यकर्ते तुलसी जोशी यांचा मोबाईल क्रमांक मिळवला होता. त्यांनी थेट संबंधित बिल्डरच्या कार्यालयातून तुलसी जोशींकडे विषय सांगितलं, तसेच मी शिवसैनिक असलो तरी एक मराठी माणूस समजून मला आणि माझ्या कुटुंबियांना मदत करा अशी विनंती केली. त्यामुळे तुलसी जोशी यांनी देखील पक्ष बाजूला ठेवून त्यांचा विषय समजून घेतला आणि बिल्डरच्या हातात मोबाईल देण्यास सांगितला. त्यानंतर बिल्डरने शरद कडू यांना २०१२ मध्ये गुंतवलेल्या पावणेतीन लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला आहे.

बांधकाम व्यावसायिकाने त्या शिवसैनिकाचे पैसे परत दिल्यानंतर शरद कडू या शिवसैनिकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि तुलसी जोशी यांचे जाहीर आभार मानले आहेत. तसेच राज ठाकरे मराठी माणसाच्या पाठीशी असल्याचा मला शिवसैनिक म्हणून अभिमान वाटत आहे असे म्हटले आहे. वरळी कोळीवाड्यातील शिवसैनिक शरद कडू आणि त्यांच्या पत्नी निकिता कडू यांनी मराठी कुटुंबाला न्याय दिल्याबद्दल राज ठाकरे आणि मनसेचे मनापासून आभार मनात तसा अधिकृत व्हिडिओ देखील प्रसिद्ध केला आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)#TulsiJoshi(5)MNS(95)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या