16 April 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

राजा एकटा पडला आहे असं कोण म्हणेल हे चित्र पाहून? पहा VIDEO

मुंबई : आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ५० वा वाढदिवस असल्याने, त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. परंतु सत्तेत नसताना सुद्धा सुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रचंड मराठी माणसाची आणि कार्यकर्त्यांची तोबा गर्दी पाहून ‘राजा एकटा पडला’ आहे असं केवळ राजकारण न समजणाराच बोलू शकतो.

राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी आलेल्या लोकांची गर्दी एवढी प्रचंड आहे की पक्षाला वेगळा मंडप उभारावा लागला आहे. कोणत्याही राजकीय नेत्याचं वजन तेंव्हाच खरं समोर येत जेंव्हा तो सत्तेत नसतो. कारण सत्ता हेच कार्यकर्त्यांना बांधून ठेवण्याचं मोठं साधन म्हणून ओळखलं जातं. सत्ता आल्यावर सर्वच सत्ताधारी नेत्याच्या आजूबाजूला घुटमळत असतात, पण वास्तव समोर येत ते सत्ता गेल्यावर असंच एकूण राजकारणात म्हटलं जात.

कोणताही राजकीय पक्ष वाढतो तो कार्यकर्त्यांमुळेच हे वास्तव आहे. आज नेते त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी जरी इतर पक्षात जात असले तरी कार्यकर्त्यांची मात्र मोठी रीघ आणि ओढा आजही मनसेकडे असल्याने भविष्य आजही आशादायी असल्याचं हा विडिओ म्हणजे एक उदाहरण आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या