5 November 2024 6:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, मिळेल 66% पर्यंत परतावा - NSE: ASHOKLEY Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON
x

दिल्लीत व राज्यात सत्ताधारीच उपोषणावर

नवी दिल्ली : देशात बहुमताने निवडून आलेल्या भाजप सरकारवर अखेर उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. मुळात काँग्रेस राजवटीत सुद्धा भाजपने अनेकदा संसदेच काम रोखून धरलं होत हे लक्षात घेणे गरजेचे आहे. केवळ विरोधकांनी ‘छोले भटोरे खात’ उपोषण केलं म्हणून आम्हीच ‘सच्चाग्रही’ आहोत हे दाखवण्यासाठी हा भाजपचा अट्टाहास आहे अशी प्रतिक्रिया सामान्य व्यक्त करत आहेत.

काँग्रेसने आणि यूपीएच्या घटक पक्षांनी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन गोंधळ घालून वाया घालवल्याने त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपने आजचा उपोषणाचा देशभर कार्यक्रम आखला आहे.

नरेंद्र मोदी दिल्लीत, अमित शहा कर्नाटकात तर मुख्यमंत्री फडणवीस मुंबईत उपोषणाला बसणार आहेत. तसेच त्यात भाजपचे इतर नेते सुद्धा सहभागी होतील. गुरुवारी सकाळी ११ वाजता हे उपोषण सुरु होऊन संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हे आत्मक्लेष उपोषण होणार आहे.

नागरिकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तेव्हा त्यांनी भाजपच्या या उपोषण नाट्याला केवळ उत्तराला प्रतिउत्तर असेच वर्णन केलं. यातून सध्या काय होणार हे उपोषणकर्त्यांना सुद्धा माहित नसावं.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x