15 January 2025 3:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL RattanIndia Power Share Price | 12 रुपयाचा शेअर खरेदीला गर्दी, तुफान तेजी, यापूर्वी 502% परतावा दिला - NSE: RTNPOWER Motilal Oswal Mutual Fund | पगारदारांना सुद्धा श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, डिटेल्स सेव्ह करून ठेवा
x

४६ महिने, मोदी सरकारकडून तब्बल ४,३४३ कोटींची जाहिरातबाजी

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारने मागील ४६ महिन्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिरातबाजीवर तब्बल ४,३४३ कोटीं २६ लाख इतका प्रचंड खर्च केला आहे. काही महिन्यापूर्वी जाहिरातबाजीवर होणाऱ्या उधळपट्टीबाबत सर्वच थरातून टीका झाल्यावर त्यात २५ टक्के कपात करण्यात आली होती.

जाहिरातबाजीच्या खर्चावरील टीकेनंतर त्यात कपात करण्यात आणि त्यामुळे गेल्यावर्षीच तुलनेत केंद्रातील मोदी सरकारने ३०८ कोटी रुपये कमी खर्च केले आहेत हे समोर सुद्धा समोर आले आहे. ही माहिती, आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे नवीन सरकार स्थापन झाल्यापासून ते आतापर्यंत विविध जाहिरातीवर झालेल्या खर्चाची माहिती मागितली होती. भारत सरकारच्या ब्युरो ऑफ आऊटरिच एंड कम्युनिकेशन खात्याचे वित्तीय सल्लागार तपन सुत्रधर यांनी अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात १ जून २०१४ पासूनची संपूर्ण माहिती उपलब्ध पुरविली आहे.

१. १ जून २०१४ ते ३१ मार्च २०१५ : जाहिरातीवर एकूण खर्च
इलेक्ट्रॉनिक मीडिया – ४४८ कोटी ९७ लाख रुपये
प्रिंट मीडिया – ४२४ कोटी ८५ लाख रुपये
बाह्य प्रचार – ७९ कोटी ७२ लाख रुपये

२. २०१५ ते २०१६ पर्यंत : जाहिरातीवर एकूण खर्च
इलेक्ट्रॉनिक मीडिया – ५४१ कोटी ९९ लाख रुपये
प्रिंट मीडिया – ५१० कोटी ६९ लाख रुपये
बाह्य प्रचार – ११८ कोटी ४३ लाख रुपये

३. २०१६ ते २०१७ पर्यंत : जाहिरातीवर एकूण खर्च
इलेक्ट्रॉनिक मीडिया – ६१३ कोटी ७८ लाख रुपये
प्रिंट मीडिया – ४६३ कोटी ३८ लाख रुपये
बाह्य प्रचार – १८५ कोटी ९९ लाख रुपये

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x