5 November 2024 7:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, 70% पर्यंत कमाई होणार - NSE: TATAPOWER
x

राणेंच्या अत्याधुनिक इस्पितळात गरिबांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार

पडवे-कसाल : राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वप्नातील अत्याधुनिक एसएसपीएम लाईफटाईम हॉस्पिटल अ‍ॅण्ड मेडिकल कॉलेजमध्ये उपचार आणि शस्त्रक्रिया होणा-या रुग्णांना आता शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य सुविधेचा लाभ मिळणार आहे. दरम्यान, सदर योजनेतून पिवळे व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबियांना २२ पेक्षा अधिक आजारांवर मोफत औषधोपचार, फेरतपासणी, आंतररुग्ण उपचार, शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत.

रुग्णालयाच्यावतीने रुग्णांना मोफत जेवण तसेच रुग्णाला जाताना घरापर्यंत हॉस्पिटलच्या खर्चाने पोहोचविण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. या योजनेतून होणा-या मोफत उपचार व शस्त्रक्रियांचा लाभ जिल्ह्यातील रुग्णांनी जरूर घ्यावा, असे आवाहन हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजचे संस्थापक माजी मुख्यमंत्री, खा. नारायण राणे यांनी केले आहे.

खा. नारायण राणे पुढे म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनतून या हॉस्पिटलमध्ये गंभीर आजार, तसेच अतिदक्षता विभागातील रुग्णांवर मोफत उपचारांची सोय झाली आहे. याशिवाय अपघातात जखमी झालेल्या रुग्णांवर तातडीची उपचार व शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच महिला प्रसुती आणि अस्थी रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया त्याशिवाय कर्करोग, हृदयरोग, स्त्रीरोग, बालरोग सारख्या गंभीर व दुर्धर आजारांवर तसेच ८०० हून अधिक आजारांवर लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये उपचारांची सुविधा उपलब्ध आहे. अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सुसज्ज अशी कॅथलॅब, जिल्ह्यातील पहिले परिपूर्ण कॅन्सर तसेच न्युरो व युरॉलॉजी सेंटरची सुविधा लाईफटाईममध्ये उपलब्ध आहे.

जनसामान्यांच्या माहितीसाठी आणि जलद आरोग्य सेवेसाठी लाईफटाईम हॉस्पिटलच्यावतीने लवकरच जिल्हास्तरीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. रुग्णसेवेसाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री तसेच तज्ज्ञ व कुशल डॉक्टर्स व कर्मचारी २४ तास हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत, असेही खा. राणे म्हणाले. तसेच कॅथलॅबची सुविधा, एन्जिओग्राफी आणि एन्जिओप्लास्टी सुद्धा मोफत होणार आहे हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितले. डायलेसीस सकट मेंदू, मूत्र, कॅन्सर उपचार, शस्त्रक्रिया सुविधा केवळ लाईफटाईममध्येच उपलब्ध असतील.

त्यामुळे आज आणि भविष्यत सिंधुदुर्गवासीयांसाठी राणे कुटुंबीयांचं हे अत्याधुनिक इस्पितळ आरोग्याच्या अनुषंगाने एक वरदान ठरणारं आहे. तसेच महागडे आणि अत्याधुनिक इस्पितळात केले जाणारे उपचार आता कोकण वासियांना कोकणातच उपलब्ध झाल्याने रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मुंबई सारख्या शहराकडे धाव घेण्याची वेळ येणार नाही. विशेष म्हणजे यामुळे स्थानिकांना मोठा आर्थिक दिलासा तर मिळणारच आहे, परंतु त्यासोबत शहरात उपलब्ध असणाऱ्या आधुनिक आरोग्य सेवा आता थेट सिंधुदुर्गात उपलब्ध झाल्या आहेत.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x