Mumbai Cruise Raided | क्रूझवरील धाड | संबंध नसताना पार्थ पवारांना अडकवण्याची योजना होती? - सविस्तर

मुंबई, 0९ ऑक्टोबर | एकाबाजूला एनसीबीने क्रूझवरील पार्टीत एकूण १० जण सापडले. पण कोर्टात ८ जणांना हजर करण्यात आलं. दोघांना सोडून देण्यात आलं. यातलं एक व्यक्ती भाजपच्या बड्या नेत्याशी (Mumbai Cruise Raided) संबंधित होती. भाजप नेत्याचा मेहुणा त्याच क्रूझवर होता, तोदेखील आरोपी होता. मात्र एनसीबीनं त्याला सोडून दिलं. याचे पुरावे, व्हिडीओ पत्रकार परिषद घेऊन देण्यात येतील, असं मलिक यांनी सांगितलं. एनसीबीनं भाजप नेत्याच्या मेहुण्याला का सोडलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यानुसार आज त्यांनी सर्व पुरावे समोर ठेवले.
Mumbai Cruise Raided. From the very first day of the action, the whole subject was centered around Shah Rukh Khan’s son. As the subject progressed, the BJP’s connections came to the fore with evidence. However, according to sources, a plan was hatched against Parth Pawar :
विशेष म्हणजे NCB’ची कारवाई बनावट असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. दुसरीकडे आर्यन खानसोबत आरोपी असलेल्या अरबाझच्या वकिलांनी देखील संबंधित ठिकाणी NCB’च्या अधिकाऱ्यांनी ड्रग्ज ठेवल्याचा आरोप करताना क्रूझमधील व्हिडिओ तपासा असा दावा आत्मविश्वासाने केला आहे. त्यामुळे अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत.
धाडीत आर्यन खान अडकल्याने अर्थात माध्यमं शाहरुख आणि आर्यनवर दोन दिवस केंद्रित होती. धाड टाकली तेव्हा आणि आरोपींना ACB कार्यालयात घेऊन जाताना अनेक गोष्टी बाहेर पडतील याचा सुगावा धाडीतील काही लोकांना लागला होता. परिणामी अचानक एक IPS अधिकारी देखील या धाडीत अडकल्याच्या बातम्या पसरू लागल्या होत्या. विशेष म्हणजे गुन्हेगारी विश्वाचा अभ्यास असणाऱ्या काही तज्ज्ञांनी म्हटल्याप्रमाणे अशी हायप्रोफाईल प्रकरणं जाणीवपूर्वक निर्माण केली जाऊ शकतात.
मात्र प्रकरण हायप्रोफाईल असल्याने साहजिकच माध्यमांचे कॅमेरे आर्यन खानवर केंद्रात झाले होते आणि प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद होतं होता. परिणामी ACB कार्यालयात काही ठराविक चेहऱ्यांच्या हालचाली अधिक दिसल्या आणि तीच लोकं धडाकेबाज कार्यवाही करणारे अधिकारी आहेत असा भास निर्माण झाला. विशेष म्हणजे आरोपींना एनसीबी कार्यालयात हजर करताना धाडीवेळी जी स्थानिक पोलिसांची कुमक मागविण्यात आली होती आणि प्रत्यक्ष एनसीबी अधिकारी यांना बाजूला करून भाजप संबंधितांना पुढे केल्याने अंतर्गत धुसपूस वाढून माहिती लीक झाली आणि अनेक सत्य समोर आली.
कारवाईच्या पाहिल्यादिवसापासून संपूर्ण विषय शाहरुख खानच्या मुलाभोवती भोवती केंद्रित होता. विषय जसजसा पुढे सरकला तसतसं भाजपचे कनेक्शन पुराव्यासहित समोर आले आहेत. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पार्थ पवार यांच्या संबंधित एक योजना आखली आखण्यात आली होती. त्यानुसार धाडीच्या पहिल्या दिवशी एक IPS अधिकारी अडकल्याचे वृत्त होते, पण तसं काही नव्हतं हे देखील उघड झालं. म्हणजे मुंबई पोलीस हे देखील टार्गेटवर पुन्हा होते का असा संशय सुद्धा बळावला. आधी NCB आणि त्यानंतर २-३ दिवसात IT’च्या धाडी टाकून अजित पवार यांना राजकीय दृष्ट्या अडकवण्याची योजना होती असं देखील सूत्रांनी सांगितलं आहे.
अगदी या योजनेचा भाग असलेल्या काही जणांना जवाबदारी देण्यात आल्याप्रमाणे त्यांनी चुकीची माहिती पसरविण्यास सुरुवात केली होती. त्यात डिजिटल पोर्टल्सला माहिती कशी जाईल याची विशेष काळजी घेण्यात आली होती असं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यात केंद्रस्थानी होते ‘पार्थ पवार’ आणि त्यामागील योजना होती उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झुकवणं तसेच राष्ट्रवादीच्या पुढच्या पिढीची बदनामी करून पवार कुटुंबियांभोवती नकारात्मक वलय निर्माण करणं. परंतु, धाडीतील संबंधित राजकीय पदाधिकाऱ्यांनी सदर विषयाचा कोणताही पुरावा दिला नाही, पण उलट भाजप कनेक्शनचे अनेक पुरावे समोर आले आहेत. त्यांनी या धाडीच वलय निर्माण करताना पार्थ पवारांना केंद्रस्थानी ठेवलं होतं असं देखील वृत्त आहे.
त्यासाठी फेक बातम्या पेरण्यास सुरुवात केली होती. ‘द फोकस इंडिया’ या डिजिटल न्यूजने याबाबत ०५ ऑक्टोबरला सकाळीच हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं. त्यात कोणाचाही नाव घेण्यात आलं नाही, परंतु संपूर्ण रोख हा पार्थ पवार आणि पवार कुटुंबीय होते हे स्पष्ट होतं. अगदी धाडीच्या दुसऱ्या दिवशीच पुढच्या स्क्रिप्टवर काम सुरु झालं होतं. अशीच वृत्त काही अमराठी डिजिटल न्यूजवरही प्रसिद्ध झाली होती. मात्र आता भाजप आणि एनसीबी अडचणीत येताच त्याची पेरणी आज पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी काय योजना आखली जाईल याची शास्वती देता येणार नाही, परंतु सत्ताधारी आक्रमक न झाल्यास त्यांना याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागू शकते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Mumbai Cruise Raided BJP connections target was Parth Pawar.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
IRB Infra Share Price | इन्फ्रा कंपनी शेअर फोकसमध्ये, टार्गेट प्राईस अपडेट, यापूर्वी 808 टक्के परतावा दिला - NSE: IRB
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
Vedanta Share Price | यापूर्वी 10,623 टक्के परतावा दिला, पुढे अजून कमाई होणार, फायद्याची अपडेट आली - NSE: VEDL
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Yes Bank Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, 17 रुपयांचा शेअर मालामाल करणार, टॉप ब्रोकिंग हाऊस बुलिश - NSE: YESBANK