11 January 2025 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Property Rights | अनेकांना माहित नाही, लग्नानंतर मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क असतो का, कायदा काय सांगतो लक्षात ठेवा BHEL Share Price | पीएसयू BHEL कंपनी शेअर फोकसमध्ये, रेलिगेअर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BHEL Home Loan Benefits | 90 टक्के लोकांना माहित नाही, घर खरेदीसाठी पैसे असूनही लोक गृहकर्ज का घेतात, हे आहे फायद्याचे गणित Post Office Schemes | पोस्ट ऑफिसच्या '6' दमदार योजना, लाखोंच्या घरात परतावा मिळेल, सरकारी योजनांचा फायदा घ्या Bajaj Pulsar | नवीन बजाज 'पल्सर RS 200' लॉन्च ; ॲडव्हान्स फीचर्स आहेत कमालीचे, किंमत पाहून लगेच खरेदी कराल IREDA Share Price | इरेडा शेअर 6 महिन्यात 28 टक्क्यांनी घसरला, तज्ज्ञांकडून तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA IPO GMP | स्वस्त IPO आला रे, GMP रॉकेट तेजीत, फक्त 14,124 रुपयांची गुंतवणूक मालामाल करणार - IPO Watch
x

नारायण राणेंनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकारली

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्वीकरली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांची दिल्लीत अमित शहा यांच्याशी चर्चा झाली होती.

नारायण राणेंनी भाजपची ही ऑफर स्वीकारल्याने ते सोमवारी राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. भाजपचं संख्याबळ पाहता ते सहज निवडून येतील.

नारायण राणेंनी काँग्रेसच्या आमदारकीचा तसेच पक्षाला सोडचिठ्ठी देऊन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती. त्यानंतर त्यांनी लगेचच एनडीएला समर्थन देऊन मंत्रिमंडळात सामावून घेण्यासाठी भाजप कडे हालचाली सुरु केल्या होत्या. त्यानतंर भाजपने ही त्यांना बराच वेळ ताटकळत ठेवले होते.

काही दिवसांपूर्वीच दिल्लीला अमित शहा यांच्याशी झालेल्या भेटी दरम्यान त्यांना राज्यसभेची ऑफर देण्यात आली होती. परंतु राणेंनी विचार करण्यासाठी थोडा वेळ मागितला आणि अखेर त्यांनी राज्यसभेची ऑफर स्वीकारली आहे.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x