23 February 2025 3:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office FD Vs RD | पोस्ट ऑफिस FD की RD, 5 लाखांच्या ठेवीवर जास्त फायदा कुठे मिळेल येथे जाणून घ्या Gratuity Money Alert | प्रायव्हेट नोकरी करणाऱ्यांच्या खात्यात ग्रॅच्युइटीचे 2,01,923 रुपये जमा होणार, बेसिक सॅलरी प्रमाणे रक्कम मिळेल GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रा कंपनी शेअर तेजीत, यापूर्वी 315% परतावा दिला - NSE: GTLINFRA Vodafone Idea Share Price | पेनी शेअर मालामाल करणार, मिळेल 100% परतावा, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: IDEA HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअरबाबत सकारात्मक संकेत, तज्ज्ञांकडून अपसाईड तेजीचे संकेत - NSE: HAL Tata Motors Share Price | टाटा मोटर्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी दिले संकेत - NSE: TATAMOTORS SBI Home Loan EMI | एसबीआय गृहकर्जाचे व्याजदर घटले, EMI मध्ये दरमहा इतकी बचत होऊन लाखोंचा फायदा होणार
x

मोदी लाटेतील शिवसेना खासदार विनायक राऊतांना २०१९ ची लोकसभा अवघड?

कणकवली : एनसीपीचे सर्वेसेवा शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या दरम्यान कणकवली येथे दीर्घकाळ चर्चा झाली. दरम्यान, सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये ‘तुझ्यागळा माझ्यागळा’ सुरु झाल्याने नारायण राणे यांना युती होणार असल्याची खात्री आहे. तसे झाल्यास रत्नागिरी मतदारसंघ पुन्हा शिवसेनेच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश यांनी हे या मतदारसंघातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने लोकसभा लढवणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, त्यांना राष्ट्रवादीने सुद्धा पाठिंबा द्यावा आणि त्या मोबदल्यात निलेश राणे केंद्रात राष्ट्रवादीला सर्मथन करून त्यांच्या समर्थक खासदारांच्या संख्येमध्ये भर टाकतील असा समझोता झाल्याचे वृत्त आहे.

मागील अनेक महिन्यांपासून नारायण राणे यांनी हा मतदारसंघ बांधणीसाठी जोरदार प्रयत्न केले आहेत आणि त्यांनी येथे चांगले पक्षीय बळ निर्माण केले आहे. नाणार रिफायनरी प्रकल्पामुळे आणि शिवसेनेच्या वरवरच्या भूमिकेमुळे कोकणी माणूस शिवसेनेवर नाराज आहे. त्यात मोदी लाटेत खासदारकीची लॉटरी लागलेले विनायक राऊत यांनी नेमकी काय विकासाची कामं केली हा संशोधनाचा विषय आहे. स्वतः विनायक राऊतांना सुद्धा या पराभवाची चुणूक लागल्याने ते आतापासूनच राष्ट्रवादीचे माजी आमदार भास्कर जाधव यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेऊन मदतीची अपेक्षा करत आहेत. भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्यातील राजकीय वैमनस्य सर्वश्रुत असल्याने शिवसेना त्यांच्याकडे हात जोडत आहे.

आघाडीतील वाटपानुसार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. पण आघाडी विषयीच्या चर्चेत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा आग्रह एनसीपीच्या नेत्यांनी धरला आहे. त्यात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास विरोध असला तरी राज्य पातळीवरील वरिष्ठ नेते मात्र काँग्रेसकडे या मतदारसंघासाठी प्रबळ उमेदवार नसल्याचे मान्य करतात. त्यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडण्यास ते तयार आहेत. तसेच विद्यमान आमदार तटकरे आणि नारायण राणे यांची जवळीक वाढल्याने विनायक राऊत यांना घरीच बसवयच सर्वांनी निश्चित केल्याचे समजते.

त्यामुळे पवारांनी एकूण राष्ट्रवादीच्या खासदारांचा आणि समर्थक खासदारांचा आकडा वाढविण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे नितेश राणेंचं आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना घरचा रस्ता दाखवतील हे काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते सुद्धा मान्य करत आहेत. नारायण राणे भाजपचे खासदार असले तरी त्यांना शिवसेनेशी युती अजिबात मान्य नाही. यामुळेच राणे पुत्राने लोकसभेची निवडणूक महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या वतीने लढवावी आणि त्याला काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने पाठिंबा द्यावा, अशी व्युहरचना आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Narayan Rane(145)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x