15 January 2025 12:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा
x

फडणवीसांच्या दत्तक नाशिकच्या पोकळ विकासावर भाजप आमदार संतापल्या | निकृष्ट दर्जाच्या, खड्डेयुक्त रस्ते कामात कंत्राटदाराच्या फायद्याचा आरोप

MLA Devyani Farande

नाशिक, २२ सप्टेंबर | आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. नाशिक महापालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी महिन्यात होत आहेत. त्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी करत आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे देखील नाशिकमध्ये पक्ष बांधणीच्या कामात व्यस्त आहेत.

फडणवीसांच्या दत्तक नाशिकच्या विकासावर भाजप आमदार संतापल्या, निकृष्ट दर्जाच्या, खड्डेयुक्त रस्ते कामात कंत्राटदाराचा फायदा – Nashik BJP MLA Devyani Farande not happy with road development work in the city :

दुसरीकडे भाजपच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. कारण निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला अंतर्गत टीकेचा सामना करावा लागत आहे. कारण भाजप आमदार देवयांनी फरांदे यांनी शहरातील रस्त्यांवरचे खड्डे भरण्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप केला असून, या कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

नाशिक महापालिकेत सत्ताधारी असणाऱ्या भाजपमध्ये अंतर्गत कलह प्रचंड वाढला आहे आणि अनेक नेते इतर पक्षांच्या संपर्कात आहेत. दरम्यान, यापूर्वी डेंग्यूवरून स्वतःचीच सत्ता असलेल्या महापालिकेला लक्ष्य करणाऱ्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी आता शहरातील खड्डे भरण्याच्या कामावरून पुन्हा एकदा तोफ डागली आहे. त्यांनी या खड्डे कामाची चौकशी करण्याची मागणी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे.

नाशिक महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या पत्रात फरांदे यांनी म्हटले आहे की, ‘नाशिक शहरामध्ये पावसामुळे पडलेले खड्डे भरण्याचे काम काही ठिकाणी सुरू आहे. हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. दोन दिवसांत खड्डे भरलेल्या जागी पुन्हा खड्डे पडत आहेत. खड्ड्यातील कच बाहेर आल्यामुळे या ठिकाणी अपघात होत आहेत. या कामात केवळ कंत्राटदाराचा फायदा हाच उद्देश असल्याचे समोर येत आहेत. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाची आपण स्वतः पाहणी करावी व चौकशी करावी. काम करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादी टाकावे. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या खड्डे भरण्याच्या कामाची जोपर्यंत आयुक्त स्वतः पाहणी करून याबाबत अहवाल देत नाहीत, तोपर्यंत कंत्राटदाराची बिले देण्यात येऊ नयेत’, अशी मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Nashik BJP MLA Devyani Farande not happy with road development work in the city.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x