22 February 2025 2:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

नवी मुंबईत भाजपाला धक्का | कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांचा मनसेत प्रवेश

Raj Thackeray

मुंबई, ३१ मे | भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी मागील काही काळापासून पक्षाला राम राम ठोकून इतर पक्षात प्रवेशाचा सपाटा लावल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये भाजपाला सर्वाधिक राजकीय धक्के हे शिवसेना राष्ट्रवादीने दिल्याचं पाहायला मिळतंय. आता त्यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील भर टाकून भाजपाची चिंता वाढवली आहे. आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळतंय.

भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत नितीन काळे यांनी मनसेत प्रवेश केला. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेची ताकद वाढणार आहे.

नितीन काळे यांनी भारतीय जनता पक्षाचा हात सोडून सत्ताधारी शिवसेना किंवा राष्ट्रवादीपेक्षा मनसेचे इंजिन चालवण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काळे यांच्यामुळे कळंबोलीत मनसेला अधिक ताकद मिळणार आहे. राज ठाकरे यांनी नितीन काळे यांचे स्वागत करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरं महत्त्वपूर्ण मानली जातात.

 

News English Summary: Bharatiya Janata Party’s Navi Mumbai Kalamboli Deputy City President Nitin Kale took the MNS flag. Nitin Kale joined MNS in the presence of Maharashtra Navnirman Sena president Raj Thackeray. The strength of MNS will increase on the backdrop of the upcoming Navi Mumbai Municipal Corporation elections.

News English Title: Navi Mumbai Kalamboli BJP Leader Nitin Kale joins MNS party in presence of Raj Thackeray ahead of Navi Mumbai Election news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#RajThackeray(190)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x