28 April 2025 4:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या गतीने कमाई होईल; पीएसयू शेअरबाबत फायद्याची अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RVNL
x

पवारांची अमित शहांवर टीका, न्यायालयाचे निर्णय सुद्धा तुम्हाला मान्य नाहीत

पुणे : पुण्यात एनसीपीच्या संविधान बचाव यात्रेची समारोप सभा आज पार पडली. दरम्यान, या कार्यक्रला प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा सुद्धा भाषणादरम्यान समाचार घेतला आहे.

अमित शहा यांनी कुणत्याचं केलेल्या वक्तव्यावरुन त्यांना न्यायालयाचे निर्णय सुद्धा मान्य नसल्याचे दिसून येते आहे असे पवार म्हणाले. शबरीमला मंदिर प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर केरळ राज्य सरकारने महिलांना मंदिरात प्रवेश देण्याची तयारी सुरु केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालय असे निर्णय कसे देते असं भाष्य केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. परंतु भाजप अध्यक्ष अमित शहा यांना कोर्टाने दिलेले निर्णय सुद्धा भारतीय जनता पार्टीला मंजूर नाहीत हेच यावरून स्पष्ट होते असे पवार यांनी भाषणादरम्यान म्हटले आहे.

याचा कार्यक्रमा दरम्यान बोलताना शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकार आणि भारतीय जनता पार्टीच्या हुकूमशाही धोरणावर सडकून टीका केली. CBI सारख्या भारतातील महत्वाच्या आणि स्वतंत्र यंत्रणांच्या प्रमुखांना एका रात्रीत कसे काढण्यात आले. विशेष गोष्ट म्हणजे, ज्या व्यक्तींच्या चौकशी सुरू आहेत, त्यांनाच प्रमुख म्हणून त्यांच्या जागी नेमण्यात आले आहे. आम्ही ज्याप्रकारे वागत आहोत केवळ तेच बरोबर आहे, असे देशावर ठसवण्यात आल्याचे शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका करताना म्हटले.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Amit Shah(265)#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony