15 November 2024 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC
x

शिवसेनेने नाणार'ला जाऊन अध्यादेश रद्द केल्याचे सांगितले, मग करार कसा झाला? राष्ट्रवादी

मुंबई : आधीच नाणार प्रश्नी अडचणीत असलेल्या शिवसेनेला राष्ट्रवादीने काही प्रश्न उपस्थित करून कोंडीत पकडले आहे. शिवसेनेने नाणार प्रकल्पाच्या स्थळी जाऊन नाणार’संबंधित अध्यादेश रद्द केल्याची घोषणा केली होती. मग नाणार प्रकल्पाचा करार कसा झाला असा थेट सवाल पत्रकार परिषदेत केला आहे.

कोकणातील राजापूर मधील नाणार येथे रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. त्या संबंधित करारावर काही दिवसांपूर्वी दिल्लीत स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. परंतु राष्ट्रवादीने पुन्हा शिवसेनेला लक्ष केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी थेट पत्रकार परिषदेत राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांना प्रश्न केले आहेत.

शिवसेनेने म्हणजे उद्योग मंत्री सुभाष देसाईंनी नाणार’च्या प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी जाऊन भर सभेत अध्यादेश रद्द करण्याची घोषणा केली होती, मग करार झालाच कसा असा सवाल केला आहे. या प्रकल्पामध्ये गुजरातच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी केल्याचे कागदोपत्री आरोप आधीच करण्यात आले आहेत. त्यात काही दिवसांपूर्वी दिल्लीत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष शिवसेनेला अडचणीत आणत आहेत.

हॅशटॅग्स

#NCP(372)#Shivsena(1170)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x