21 November 2024 6:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
x

खडसेंकडून महाजनांच जळगावातील साम्राज्य खालसा करण्याची तयारी | जिल्हा परिषदही धोक्यात?

NCP leader Eknath Khadse panning to damage Girish Mahajan in Jalgaon ZP election too news updates

जळगाव, १० एप्रिल: काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने जळगाव महानगरपालिकेत भाजपाला धूळ चारत स्वतःचा महापौर बसवला. त्यानंतर गिरीश महाजन यांना जोरदार धक्का दिल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम ठोकून राष्ट्र्वादीत प्रवेश केल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी वेगाने हातपाय पसरत आहे.

आता एकनाथ खडसे जळगाव जिल्हा परिषदेत भाजप आणि गिरीश महाजन यांना जोरदार राजकीय धक्का देण्याची योजना आखत आहेत. त्यांनी यासंदर्भात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या गटनेत्यांशी चर्चाही केली आहे. त्यामुळे लवकरच महाजनांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जळगाव जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. या निवडणूकीला अजून निवडणुकीला १ वर्ष बाकी आहे. अशा स्थितीत भारतीय जनता पक्षाची सत्ता घालवण्याची तयारी सुरू झाली आहे. जळगाव येथे खडसेंच्या मुक्ताई निवासस्थानी जिल्हा परिषदेतील महाविकास आघाडीच्या गटनेत्यांशी चर्चा करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत साळुंखे, शिवसेनेचे गटनेते रावसाहेब पाटील, काँग्रेसचे गटनेते प्रभाकर सोनवणे, राष्ट्रवादीचे नेते रवींद्र पाटील, माजी आमदार गुरुमुख जगवांनी उपस्थित होते. याबाबत माहिती देताना रवींद्र पाटील यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेतील सत्तांतर करण्याबाबत चर्चा झाली. तसेच, जामनेर येथे जिल्हा परिषदेच्या जागेत व्यापारी संकुल उभारून झालेल्या दोनशे कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणाचाही चर्चा करण्यात आली होती.

 

News English Summary: A few days ago, Shiv Sena and NCP installed their own mayor in Jalgaon Municipal Corporation. After that, there were rumors that Girish Mahajan was pushed hard. After Eknath Khadse joined the NCP by beating the BJP, the NCP is spreading rapidly in North Maharashtra.

News English Title: NCP leader Eknath Khadse panning to damage Girish Mahajan in Jalgaon ZP election too news updates.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x