22 November 2024 12:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

मिशेलने सोनियांचे नाव घेतल्याचे इडीच्या अधिकाऱ्याने ऐकले व माध्यमांमध्ये पेरले: पवार

अहमदनगर : ऑगस्ट वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी तुरूंगात असलेल्या ख्रिश्चियन मिशेलने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेणे हा केवळ एका कटाचाच भाग आहे. वास्तविक त्याने सोनियांचे नाव घेतले. परंतु ते कोणी ऐकले आहे? मात्र एका इडीच्या अधिकाऱ्याने ते ऐकले आणि त्याने सर्वांना सांगितले की मिशेलने सोनिया गांधींचे नाव घेतले. परंतु, ते खरे आहे की नाही याची कोणालाच काहीच खरी माहिती नाही.

दरम्यान, पुढे पवार म्हणाले की, देशात पहिल्यांदाच सत्तेचा अशाप्रकारे अतिरेक आणि गैरवापर होताना दिसतो आहे. देशातील सर्वोच्च संस्थांमध्ये सरकारकडून हस्तक्षेप केला जात आहे. तसेच विरोधकांना नाउमेद करण्याची भूमिका विद्यमान सरकार घेत असून, देशात आणीबाणी सदृश स्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप यावेळी एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर थेट पत्रकार परिषदेत केला.

अहमदनगर येथे पूर्व नियोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. दरम्यान, पवार पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासात प्रथमच सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. अगदी सीबीआयसारखी सर्वोच्च तपास संस्था सुद्धा त्यापासून दूर राहिली नाही. याच तपास यंत्रणेतील क्रमांक एकचे आणि क्रमांक दोनच्या अधिकाऱ्यांवर अतिशय गंभीर आरोप आहेत. त्या वादानंतर संपूर्ण प्रकरण कोर्टात गेले आहे. नंतर तीच गत आज आरबीआयची झाली आहे. आधीचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी राजीनामा दिला. मग मोदींनी थेट गुजरातेतून उर्जित पटेल यांना आणले. परंतु, त्यांच्यासोबत सुद्धा यांचे जमले नाही. कारण, रिझर्व्ह बँकेच्या पैशावर यांचा डोळा होता. त्याला उर्जित पटेल यांनी कडाडून विरोध केला. शेवटी त्यांना सुद्धा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. आता सुद्धा त्यांनी हो ला हो बोलणारा त्यांचाच माणूस बसवला आहे. त्यामुळे आपल्या देशांतर्गत संस्था डळमळीत होत आहेत. यापूर्वी देशाच्या इतिहासात असे कधीच झाले नव्हते.

हॅशटॅग्स

#Sharad Pawar(429)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x